सोलापूर शहरातील अतिक्रमण विरोधी मोहीम राबविली – पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट परिसरातील कारवाईत 53 अतिक्रमण धारकांवर कारवाई
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशाने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट या मार्गावरील 18 मी रुंदीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत अतिक्रमण धारकांना स्वतः अतिक्रमण काढण्याचे आवाहन करण्यात आले होते.
या मोहिमेअंतर्गत एकूण ५३ अतिक्रमण धारकांची नोंद घेण्यात आली असून, त्यामध्ये ५ घरमालक आणि ४८ दुकानदार यांचा समावेश आहे. विशेषतः फुटपाथवर केलेली अतिक्रमणे तातडीने हटवण्यात आली असून, दीड ते दोन फूट फुटपाथच्या आत असलेली अतिक्रमणे जी JCB ने पाडता येत नाही अश्या ना पुढील दोन दिवसांत काढणेची संधी दिले आहे.
मोहीमेदरम्यान खालीलप्रमाणे अतिक्रमित साहित्य जप्त करण्यात आले :
लाकडी दरवाजे – ९,लोखंडी रिंग – १,लोखंडी पत्रे – ४,लोखंडी जाळी – १,लोखंडी दरवाजे – २,लोखंडी गेट – १,लोखंडी बोर्ड – १,लोखंडी खाट – १,मातीचे ढेरे – २०,कुंड्या – २०,प्लास्टिक खुर्च्या – २,लाकडी बांबू – ३,लोखंडी फाळका – १,लोखंडी टेबल – २,मोबाईल दुकान समोरील २ प्लास्टिक डबे,एक फूटाचा बॉक्स,एक कॅरेट महापालिकेच्या अतिक्रमण विभाग कडील दीपक कुंभार JE, नगर रचना विभाग, पोलिस प्रशासन यांचे संयुक्त सहकार्य या कारवाईस लाभले.
महापालिका प्रशासनाने नागरिकांना विनंती केली आहे की, त्यांनी सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर अतिक्रमण करू नये अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे नियंत्रण अधिकारी तपन डंके यांनी दिली आहे.




