व्हिजन सोशल फाउंडेशन तर्फे पत्रकार काटे यांचा सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क
गोखलेनगर : पुरस्कार स्वीकारताना पत्रकार समाधान काटे,योगिता काटे (डावीकडून) भरतलाल धर्मावत , शेखर मुंदडा, विकास डाबी, चित्रा वाघ,महापौर मुरलीधर मोहोळ,राजेश पांडे
शिवाजीनगर : गोखलेनगर पुणे येथील व्हिजन सोशल फाउंडेशनच्या वतीने शुक्रवार (ता.२२) रोजी , महापौर मुरलीधर मोहोळ,सदस्या राष्ट्रीय कार्यकारिणी भाजपा चित्रा वाघ यांच्या हस्ते पत्रकार समाधान काटे यांना ट्रॉफी (सन्मानचिन्ह) देऊन गौरविण्यात आले.यावेळी विविध क्षेत्रात सामाजिक काम करणाऱ्या कार्यकत्यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या वेळी महापौर बोलताना म्हणाले “सामुहिक प्रयत्नांनी कोरोनाच्या संकटातून बाहेर पडतोय.कोरोनाच्या काळात प्राणाची बाजी लावून आरोग्य सेवक, पोलिस, डॉक्टर, सफाई सेवक झटले म्हणून सध्या परिस्थिती सर्वसाधारण आहे.संकटाच्या काळात पुणेकर एकत्र येतात आणि मदत करतात.संकटाच्या काळात केलेली मदत कायम स्मरणात राहते” यावेळी राजेश पांडे,शेखर मुंदडा,भरतलाल धर्मावत, योगिता काटे उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता केशवराज धर्मावत व राकेश डाबी यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संयोजन व्हिजन सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विकास डाबी यांनी केले होते.