मालवंडी येथे कायदे विषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी तालुक्यातील मालवंडी येथील ग्रामदैवत श्री शेका गौरी मंदिरामध्ये राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशानुसार आजादी का अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी तालुका विधी सेवा समिती बार्शी, वकील संघ बार्शी आणि लायन्स क्लब बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने लोक अदालत आणि कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लायन्स क्लब बार्शीचे अध्यक्ष ॲड विकास जाधव हे होते.यावेळी गाव शांत कसे राहील गावातील लोकांनी एकोप्याने राहून आपला विकास कसा होईल तसेच आपापसात छोटी-मोठी प्रकरणी मिटवून घेऊन वादापासून दूर राहून आपला विकास कसा करता येईल याचा विचार करणे खूप महत्त्वाचे आहे तसेच घराच्या जागेची, शेतातील रस्त्याचे, बांधाचे वाद गावातच मिटवणे महत्त्वाचे आहे तसेच तरुण मुलांनी आपल्या वयोवृद्ध पालकांचा सांभाळ करावा असे वेगवेगळ्या विषयावरती ॲंड. विकास जाधव ॲड. संजय कोकाटे, गिरीश शेटे ,आनंद पानगावकर ,यांनी मार्गदर्शन केले.यावेळी माजी. पं. स. सदस्य बाबासाहेब काटे सरपंच हनुमंत होनमाने ग्रामविकास अधिकारी के. आय. सय्यद, पोलीस पाटील पांडुरंग सलगर. ग्रामपंचायत सदस्य राम घेवारे ,नवनाथ गवळी, शिवाजी नरूटे, प्रभू कावरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या