बार्शीसामाजिक

पत्रकार तथा व्यवसाय प्रशिक्षक निलेश उबाळे यांची महिला उद्योग विकास समितीच्या बार्शी तालुकाध्यक्ष पदी निवड

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : स्वयंरोजगार प्रशिक्षण प्रबोधिनी च्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षनाचा संपूर्ण महाराष्ट्रात जागर करणारे बार्शी तालुक्यातील यावली येथील पत्रकार निलेश उबाळे यांची महिला उद्योग विकास समितीच्या बार्शी तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
सदरची निवड ही एक वर्षासाठी असून या समितीच्या माध्यमातून महिला व युवकांना रोजगाराच्या संधी मिळवण्यासाठी तथा शासनाच्या विविध योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम केले जाणार असल्याचे नूतन तालुका अध्यक्ष निलेश उबाळे यांनी सांगितले.

त्यांचा या निवडीबद्दल सर्व मिञ परिवार,पत्रकार बांधव व गावकऱ्यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button