सौ.विमलताई , वसंत प्रल्हाद माळकर यांचें प्रथम पुण्य स्मरणा निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : वागेश्वरी सौ.विमलताई , वसंत प्रल्हाद माळकर यांचें प्रथम पुण्य स्मरणा निमित्त रविवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी जिजामाता विद्यामंदीर बार्शी येथे रक्तदान शिबीर कोरोना महामारीच्या काळात रक्ताचा तूटवडा भासत असल्याने ग्रामसेवक वैभव माळकर यांनी आई वडील यांच्या प्रथम पुण्य स्मरणा निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते.
या शिबिरात 52 रक्तदात्यानी आपले रक्तदान करून सहभाग नोंदविला. या शिबिराचे उदघाटन गटविकास आधिकारी शेखर सावंत हस्ते करण्यात आले. श्रीमान रामभाई शहा रक्त पेटी यांनी सहकार्य केले.
शिबीर यशस्वी करण्यासाठी संतोष माने, मंगेश जगदाळे, दिलीप लोखंडे, राहुल गरङ, तात्यासाहेब साठे, बलभीम माळी, बबन हुबाले, प्रकाश शिन्दे, अमोल नरखडे, कृष्णा चिकने, निरंजन चिकणे , लखन चौधरी, दत्तात्रय चौधरी यानी परिश्रम घेतले.