महात्मा गांधी जयंती निमित्त गौडगाव येथे डिजिटल ७/१२ उताऱ्याचे वाटप

B1न्यूज मराठी नेटवर्क / प्रतिनिधी गौतम नागटिळक
वैराग : गौडगाव ता. बार्शी येथे महात्मा गांधी जयंतीनिमित्त महसूल विभागाच्या वतीने गौडगाव ग्रामपंचायत कार्यालय येथे डिजिटल ७ /१२ उतारे वाटप करण्यात आले. गाव कमगार तलाठी D.S वाघमारे व विकास सोसायटीचे चेअरमन हिराचंद शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये सातबारा उतारे वाटप करण्यात आले.
डिजिटल ७/१२ उतारामुळे तलाठी कार्यालयाकडे शेतकऱ्यांना हेलपाटे मारण्याची गरज नाही, घर बसल्या शेतकऱ्यांना ७/१२ उतारा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डिजिटल सातबारा उतारे यावेळी खातेदार शेतकऱ्यांना वाटपही करण्यात आले. यावेळी राहुल भड, बालाजी पैकेकर, नागेश काजळे, सागर भड, सुशांत सुरवसे आदी शेतकरी उपस्थित होते.