देश-विदेशनवी दिल्लीमहाराष्ट्र

सोलापूरचे कवी नितीन पाटील यांची कविता “राजकारण केले गुंडा” दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये गाजली

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी दिल्ली : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे- दिल्ली आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली – २०२५ चे आयोजन दि. २१, २२, २३ फेब्रु. २०२५ देशाची राजधानी दिल्लीमध्ये करण्यात आले होते. या संमेलनाची सुरुवात साहित्य ग्रंथदिंडी(पंढरपूर ते दिल्ली), चित्ररथ ,कलापथक वाजत गाजत. ढोल ताश्यांच्या गजरात झाली.

भारतातील कानाकोपऱ्यातून आलले हजारो मराठी साहित्य रसिक प्रेमी उपस्थित राहून दिल्लीत ७० वर्षांचा इतिहास जागा केला. या संमेलन प्रसंगी उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाले, स्वागताध्यक्ष शरद पवार साहेब होते,प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, संजय नहार,उषा तांबे, रविंद्र शोभणे,संमेलन अध्यक्षस्थानी डॉ.तारा भवाळकर उपस्थित होत्या.

दिल्ली येथील श्रीमंत सयाजीराजे महाराज गायकवाड सभामंडप व छत्रपती संभाजी महाराज विचार पीठावर सोलापूरचे कवी नितीन पाटील यांनी राजकारण केले गुंडा हाती ही कविता सादर करून साम-दाम-दंड भ्रष्टाचार गुंडागिरी वशिले सर्व गोष्टी विरुद्ध त्यांनी बंड केले आहे. अनेक व्यथा मांडणारी कविता सादर केली. उपस्थितांची मने जिंकली.

छत्रपती संभाजी महाराज विचारपीठ कवी कट्यावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदचे संस्थापक अभिनेते डॉ. शरद गोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार ,युवराज नळे डॉ. पोपेरे, संजय आवटे, रामदास मोरे ( तुकाराम महाराज वंशज), यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी अमोल कुंभार जितेंद्र कांबळे सर (आळेफाटा), डॉ. विजय पोपेरे (अकोले), हनुमंत अक्षदा काकडे वनिता जाधव चिकणे, हर्षदा गुळमिरे,सुषमा आलेकर, यशवंत घोडे जुन्नर, वीणा व्होरा, अलका नाईक (मुंबई), लक्ष्मण हेंबाडे ,आदेश फुलगे, संदीप तोडकर, तुकाराम जेगोले, माणिकराव गोडसे तुकाराम मोरे, हेमंत बोरसे ,तोरस्कर,सुवर्णा वाघमारे यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, बेळगाव अशा अनेक भागांतून आलेल्या निमंत्रित कवींच्या कविता सादर झाल्या.

दि २१ते २३ फेब्रुवारी ग्रंथदिंडी,मुलाखत, परिसंवाद, लोकसाहित्य, कविसंमेलन, कवी कट्टा, एकपात्री नाटृय सादरीकरण झाले. खासदार सुप्रिया ताई सुळे, सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री अजितपवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत, विजय दर्डा लोकमत वृत्तपत्र साहित्य संमेलनासाठी भारतातील असंख्य मराठी साहित्य प्रेमी उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button