महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी महापालिकेच्या विविध विभागाची केली पाहणी

0

सर्व कार्यालय स्वच्छ व सुंदर ठेवणं सह आपल्या कडे दिलेला कामकाज वेळेत पूर्ण करण्याचे सूचना दिल्या

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी महापालिकेतील मालमत्ता कर विभाग, सगणक विभाग,पाणी पुरवठा विभाग, ड्रेनेज विभाग,आरोग्य विभाग, नगर रचना विभाग, बांधकाम विभाग, नगर अभियंता, मंडई विभाग, मुख्यलेखापाल विभाग, मुख्यलेखा परीक्षक विभाग,अभिलेखपाल, समान्य प्रशासन विभाग, अन्न परवना विभाग, UCD विभाग, अंतर्गत लेखापरीक्षक विभाग या सह स्मार्ट सिटी च्या माध्यमातून कमांड अँड कन्ट्रोल सेंटर उभारणी करण्यात आली असून त्यामध्ये शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख व नियंत्रण करणेकामी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरच्या नियंत्रण कक्ष,घंटागाडी रूट मॅप, शहरातील सीसीटीव्ही, सुरक्षा यंत्रणा, पाणीपुरवठा वितरण,एलईडी दिवे, कचरा संकलन केंद्राच्या गाड्या, पाणीपुरवठा वितरण प्रणाली व स्काड प्रणाली, ड्रेनेज, अग्निशमन विभाग,आपत्ती व्यवस्थापन आदी संदर्भात माहिती घेतली.

यावेळी स्मार्ट सिटी चे मुख्यकार्यकारी अधिकारी गोपीचंद कदम, अतिरिक्त आयुक्त रवि पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखापरीक्षक रूपाली कोळी, मुख्यलेखापाल रत्नराज जवळगेकर, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, उप संचालक नगर रचना मनिष भिष्णूरकर,सार्वजनिक आरोग्य कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, विद्युत कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, संगणक विभाग प्रमुख स्नेहल चपळगावकर, प्रकाश दिवाणजी, रामचंद्र पेंटर, तपण डंके, कामगार कल्याण अधिकारी ओमप्रकाश वाघमारे आदी मन्यावर उपस्थित होते.

यावेळी आयुक्त यांनी आप आपल्या कार्यलाय स्वच्छता ठेवावे तसेच दस्तावेज,कागपत्राची वर्गीकरण करून सुस्थित ठेवणे, नागरिकांना त्रास होणार नाही यांची खबरदारी घेऊन तत्काळ कामाचा निपटरा करून देणे तसेच सर्व विभागानी आपल्या कडे दिलेला कामकाज वेळेत पूर्ण करण्याचे सूचना दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या