बार्शी मध्ये राष्ट्रीय सडक सुरक्षा अभियान संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : नेहरू युवा केंद्र सोलापूर, क्रांती बहुउद्देशीय संस्था बेलगाव, बार्शी शहर पोलीस स्टेशन व उप प्रादेशिक वहन बार्शी यांच्यावतीने राष्ट्रीय सडक सुरक्षा अभियान अभियानांतर्गत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा मोहीम दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी, बार्शी बसस्थानक आगार या ठिकाणी राबविण्यात आली.
रस्त्यावर आपली स्वतःची व इतरांची काळजी सर्व वाहनचालकांनी घ्यावी, दुचाकी वापरताना हेल्मेटचा वापर करावा, चार चाकी वाहनात बसल्यानंतर शीटबेल्ट वापरावा, वेग मर्यादित ठेवावा, अपघाताचे नियम पाळून अपघात टाळावे अशा प्रकारचे आवाहन यावेळी बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी केले. तसेच बार्शी आगार व्यवस्थापक मधुरा जाधवर यांनी देखील यावेळी उपस्थितांना वाहतुकीच्या नियमाबद्दलचे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, बार्शी आगार व्यवस्थापक मधुरा जाधवर, सहाय्यक वाहतूक अधीक्षक, विजय हांडे, क्रांती बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष धिरज शेळके, पोलीस जाणीव फाउंडेशनच्या शुभांगी बोंडवे, आतिश पालखे, आकाश नाईक सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, आधार लेखाकर गिरीश नवले यांच्यासह वाहन चालक, वाहक, मेकॅनिकल तसेच प्रवासी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाहतूक निरीक्षक मंगेश दहीहांडे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम वाघूलकर यांनी केले.