डॉ. महादेव अशोक ढगे यांना पीएचडी पदवी प्रदान

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर बार्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने शुक्रवार, दिनांक १० जानेवारी २०२५ रोजी २० व्या पदवीप्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभात डॉ. महादेव अशोक ढगे यांना महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.

समारंभात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर आणि आय.सी.टी. मुंबईचे कुलपती प्रा. जे. बी. जोशी उपस्थित होते. या प्रसंगी अनेक विद्यार्थी, पालक आणि मान्यवर मंडळींनी हजेरी लावली.

डॉ. महादेव ढगे यांनी “A Study Of Customer Satisfaction of Hospital Services In Solapur District (Maharashtra)” या विषयावर संशोधन केले आहे. त्यांच्या या महत्त्वपूर्ण कार्यासाठी डॉ. ए. ए. शेख यांचे मार्गदर्शन लाभले. या संशोधनाद्वारे रुग्णालयीन सेवांमध्ये सुधारणा घडवण्यासाठी महत्त्वपूर्ण उपाय सुचवले गेले आहेत.

राज्यपालांच्या हस्ते पदवी स्वीकारताना डॉ. महादेव ढगे यांचा हा क्षण त्यांच्या शैक्षणिक जीवनातील एक मोठा गौरव ठरला. त्यांच्या या यशामुळे कुटुंब, मित्रपरिवार आणि मार्गदर्शकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष श्री. नंदनजी जगदाळे, जनरल सेक्रेटरी श्री. पि.टी. पाटील, जॉईन सेक्रेटरी श्री. अरुण देबडवार, खजिनदार श्री जयकुमार शितोळे यांनी यांनी पीएचडी पदवी मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या