श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे २०२ रूग्णांची मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय, बार्शी व एच.व्ही. देसाई नेत्र रूगणालय, पुणे यांचे संयुक्त विध्यामाने आज दिनांक ०८/१२/२०२४ रविवार रोजी सकाळी ठिक ९-०० ते दुपारी ठीक २-०० वाजेपर्यंत मोफत नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.
या शिबिराचे उद्घघाटन मा.श्री जयचंद शांतीलाल सुराणा अध्यक्ष श्री जैनाश्रम बार्शी यांचे शुभहस्ते झाले. या वेळी वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, ऑ.सेक्रेटरी आनंद पुनमिया संचालक धिरज कुंकूलोळ, आनंद सुराणा, प्रमोद भंडारी तसेच श्री जैनाश्रमचे ऑ सेक्रेटरी अँड.दिनेश श्रीश्रीमाळ संचालक गौतमचंद बोथरा सभासद इंद्रपाल कुंकूलोळ हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे जयचंद सुराणा यांचा सत्कार वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते मोत्याची माळ, शाल, पुस्तक, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रस्तावना वाचनालयाचे ऑ सेक्रेटरी आनंद पुनमिया यांनी केले. तर आभार प्रदर्शन वाचनालयाचे संचालक धिरज कुंकूलोळ यांनी मानले. या शिबिरात २०२ रूग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली व मोफत मोतीबिंदूचे शस्त्रक्रिया साठी ५३ रूग्णांना उध्या सकाळी पुणे येथे पाठविण्यात आले आहे. तसेच १७ नेत्र तपासणी केलेल्या रूग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे.असे संचालक मंडळ यांनी जाहीर केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव, सहा.ग्रंथपाल पल्लवी तौर, क्लार्क विराज पतंगे, सेवक रेखा यादव यांनी परिश्रम घेतले.