बार्शीमहाराष्ट्रसत्कार

बार्शीत ॲड. दिलीप सोपल यांचा नागरी सत्कार आणि ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचा उत्साह

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आमदारपदी विराजमान झालेल्या ॲड. दिलीप सोपल यांचा नागरी सत्कार तसेच त्यांच्या वयाच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या रविवारी, १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता बार्शीतील जुना गांधी पुतळा, सोमवार पेठ येथे संपन्न होणार आहे.

या विशेष सोहळ्यात विविध धर्मगुरूंच्या हस्ते ॲड. सोपल यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूरचे मुख्य महंत तुकोजी बुवा (बाबा), परंडकर बृहन्मठ बार्शीचे श्री.ष.ब्र. राचलिंग शिवाचार्य परंडकर महाराज, तगरभूमी धाराशिवचे भंते सुमेदजी नागसेन, श्री भगवंत मंदिर बार्शीचे मुख्य पुजारी मधुकर (मामा) बडवे, सदर सोलापूरचे हाजी अय्यूबसाब कुरेशी, तसेच ख्रिश्चन धर्मप्रसारक रेव्ह विश्वास साळवी उपस्थित राहून नूतन आमदार दिलीप सोपल यांना आशीर्वाद देतील.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये धाराशिवचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर आणि माढाचे खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील यांचा समावेश आहे. बार्शी शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या भव्य नागरी सत्कार सोहळ्यास उपस्थित राहून ॲड. दिलीप सोपल यांना शुभेच्छा देण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button