गुरुपुष्यामृताचा योग साधत आमदार सुभाष देशमुख यांनी दक्षिणमधून भरला उमेदवारी अर्जविकास कामांच्या जोरावर तिसऱ्यांदा निवडून येण्याचा विश्वास

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारी माजी सहकारमंत्री आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुरुपुष्यामृत योग साधून आमदार देशमुख यांनी अर्ज भरला.

अर्ज भरताना त्यांच्यासमवेत भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रामप्पा चिवडशेट्टी उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळच्या सुमारास आपल्या निवासस्थानी सुभाष देशमुख यांना त्यांची नात इविका या चिमुकलीने औक्षण केले. यावेळी ,तिने तिसऱ्यांदा आमदार होण्याच्या शुभेच्छा दिल्या.

अर्ज भरल्यानंतर आमदार देशमुख म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांनी आणि महायुतीच्या नेत्यांनी मला पुन्हा एकदा जनतेच्या सेवेची संधी दिली आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात वडापुर बॅरेज, भीमा सीना जोड कालवा, मंदृप एमआयडीसी, रोजगारनिर्मिती, शैक्षणिक कामे दृष्टीपथात आहेत. आजवर केलेल्या विकासाच्या बळावर महायुतीचा विजय निश्चित आहे. मतदारसंघात हजारो कोटींची कामे केली आहेत त्यामुळे निश्चितच तिसऱ्यांदा मतदार मला निवडून देतील.

सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेला (शिंदे गट) अपेक्षित ठिकाणी महायुतीतून उमेदवारी न मिळाल्यास स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे. त्याबाबत आमदार देशमुख म्हणाले, महायुतीतील सर्व घटकपक्ष राज्य, जिल्हा आणि विधानसभा स्तरावर एकत्रच काम करणार आहेत. शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांचे जे काही म्हणणे आहे त्यावर चर्चा होईल आणि सकारात्मक निर्णय होईल. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस मनिष देशमुख, रोहन देशमुख, हणमंत कुलकर्णी, शहर सरचिटणीस विशाल गायकवाड यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या