कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक गौरव सोहळा संपन्न
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे गुणवंत शिक्षक गौरव सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर तेलंग आणि डॉ. गणपतराव मोरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव होते.
कार्यक्रमाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. संस्थेचे सचिव पी.टी. पाटील यांनी शिक्षकांच्या योगदानावर प्रकाश टाकला, तर खजिनदार जे.सी. शितोळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
शिक्षक, लिपिक आणि अन्य कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट शिक्षक व शाळा पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मुख्याध्यापिका कविता धावणे यांनी आपल्या यशाचे श्रेय सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना दिले. डॉ. गणपतराव मोरे आणि सुधाकर तेलंग यांनी शिक्षकांच्या भूमिकेवर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. किरण गाढवे व डॉ. आसावरी फरताडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ए.पी. देबडवार यांनी केले.