विपश्यना बुद्धविहाराला केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिली भेट
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई दि.6 : संभाजीनगर मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा जवळील प्राचीन धम्मभूमी बुद्ध लेणी च्या पायथ्याशी असणाऱ्या विपश्यना बुद्धविहारला रिपब्लिकन पक्षाने राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी भेट दिली. धम्मभुमी बुध्दलेणी मराठवाड्यातील पवित्र उर्जादायी बौद्धधम्म स्थळ असून यास अतिक्रमण म्हणून कोणतेही प्रशासन हात लावणार नाही.या बौद्ध धम्म स्थळास केंद्र आणि राज्य सरकार कडून अधिकृत करण्यासाठी आपण प्रयत्न करू. त्यासाठी केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहोत असे आश्वासन ना. रामदास आठवले यांनी दिले.
यावेळी संभाजी नगरचे जिल्हाधिकारी स्वामी यांच्याशी ना. रामदास आठवले यांनी दुरध्वनीद्वारे संपर्क साधुन विपश्यना बुध्दविहार परिसरात कोणतीही अतिक्रमण निष्कासनाची कारवाई करु नये. अशी सुचना केली. यावेळी भिक्खु संघ आणि श्रामणेर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष बाबूराव कदम,मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके, जिल्हा अध्यक्ष विजय मगरे, संजय ठोकळ , प्रविण नितनावरे ,आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.