गौडगाव व उपळे दुमाला मंडळात तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून सोयाबीन पिकाची पाहणी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : तालुक्यातील गौडगाव व उपळे दुमाला मंडळात गेल्या ६ ते ७ दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार व सततच्या पावसाने सोयाबीन पिकाचे हजारो हेक्टर सोयाबीन पाण्याखाली गेले आहे. या पिकाची पाहणी करण्यासाठी तहसीलदार एफ. आर. शेख व तालुका कृषी अधिकारी संतोष कोयले यांनी गौडगाव व उपळे दुमाला मंडळातील पिकाची पाहणी केली. अनेक शेतकऱ्यांचे काढणीला आलेले सोयाबीन पीक पाण्यात गेले आहे. तर काढून टाकलेल्या ढिगार्‍याखाली पाणी साचले आहे. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला आहे.

त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला असल्याने शेतकऱ्यांना खूप मोठी आर्थिक झळ यावर्षी सहन करावी लागणार आहे. शेती पिकाचे तर कधीही न भरून येणारे नुकसान झाल्याने शेतकरी अतलब झाला असून त्याला आर्थिक मदतीची गरज आहे. तहसीलदार साहेबांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले की, पिकाच्या पाहणीचा अहवाल तात्काळ जिल्हाधिकारी यांना पाठवतो. यावेळी गौडगाव मंडळ अधिकारी मनोजकुमार संकपाळ , सामाजिक कार्यकर्ते राहुल भड , अनिल यादव , युवराज काजळे , बालाजी भड , चिंटू देशमुख, संपत भड ,मदन ननवरे , लक्ष्मण लाटे , कृषी सहाय्यक ए. एफ. शिंदे आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या