मोरवंची गावात युवकांसाठी राज्यस्तरीय शिबीरप्रार्थना फाऊंडेशन आयोजित कृतिशील तरुणाई शिबिराचे उद्घाटन संपन्न
तरुणांनी सामाजिक भान जपत विचारांनी श्रीमंत होणं गरजेचं- डॉ.माधवी रायते
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : प्रार्थना फाउंडेशन व सेवादायी सोशल फाउंडेशन सोलापूर यांनी एकत्रितपणे राज्यस्तरीय कृतीशील तरुणाई शिबिराचे आयोजन केले आहे. याचा उद्घाटन समारंभ थाटात पार पडला. शिबिर ही परिवर्तनासाठी असतात इथून जाताना शिबिरार्थींनी सामाजिक भान व वैचारिक श्रीमंती घेऊन गेल पाहिजे.माणूस पैश्याने गरीब असला तरी चालेल परंतु विचारांनी श्रीमंत असायला हवा असा असा मत डॉ.माधवी रायते मॅडम यांनी व्यक्त केलं. या शिबिराचे हे दुसरे वर्ष असून शिबिर 21 ते 26 मे या कालावधीत पार पडणार आहे.
राज्यभरातून अर्ज केलेल्यांपैकी काही निवडक विद्यार्थी घेतले गेले आहेत. या शिबिरामध्ये शून्यातून आपलं विश्व घडवलेल्या मान्यवरांशी गप्पा मारण्याची संधी मिळणार असून श्रमदान, गटचर्चा, नाईट वॉक आंतरराष्ट्रीय चित्रकार शशिकांत धोत्रे यांच्या गॅलरीला भेट, पथनाट्य तसेच वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न त्यांना समजणार आहेत.
प्रार्थना फाउंडेशन ही संस्था मागील कित्येक वर्षापासून समाजातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील, अनाथ ,वंचित आणि निराधार मुलांच्या शिक्षणासाठी तसेच संगोपनासाठी काम करते. त्याचबरोबर समाजातील बेघर, निराधार आजी-आजोबांसाठी देखील काम करत आहे. समाजातील या वंचित, निराधार घटकांसाठी काहीतरी काम करण्याची संधी या शिबिराच्या माध्यमातून या सर्व युवकांना मिळणार आहे. शिबिराच्या माध्यमातून एक सक्षम युवक घडवण्याचे काम होणार आहे. हे शिबिर निवासी असून राज्यभरातील जवळपास 75 युवक युवतींचा यांच्यामध्ये सहभाग असणार आहे.
शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंग जगदीश पाटील, सुरेश धोत्रे,यशवंत कुंभार, मनीषा सरावळे, प्रार्थना फाऊंडेशन च्या अनु मोहिते, शुभम मिसळ, विष्णू भोसले, वकील हिमोने व शिबिरार्थी उपस्थित होते.