मुंगशीत वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसानप्राथमिक शाळेचे उडाले पत्रे, विद्युत पोल पडुन विजपुरवठा खंडीत
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : बार्शी तालुक्यातील मुंगशी ( वा ) येथे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे तसेच मोठ – मोठी झाडी , कडब्याच्या गंजी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पत्रे उडून गेल्याने शाळेचे मोठे नुकसान झाले आहे तसेच शाळेतील साहित्य व कागदपत्रे भिजून खराब झाली आहेत तसेच विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावर झाडे पडुन खांब जमिनिवर कोलमाडले आहेत. या अचानक आलेल्या वादळामुळे पत्रे उडाल्याने अनेकांच्या भिंतीला तडे गेले आहेत तसेच गावातील अनेक झाडे मोडून पडली आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते.
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळे वरील पत्रे उडुन गेल्याने भिंतींचा काही भाग ढासळला आहे तसेच दुसरी इमारतही यामुळे धोकादायक बनली आहे त्यामुळे शाळा भरवण्यासाठी जागेची आवश्यकता आहे तरी प्रशासनाच्या वतीने लवकर दखल घेऊन इमारतीची सोय करावी – महादेव अंबुरे , प्राथमिक शिक्षक
वादळी वाऱ्यामुळे गावातील अनेक नागरिकांचे तसेच प्राथमिक शाळेचे मोठे नुकसान झाले आहे तरी प्रशासनाने त्वरीत पंचनामे करून तात्काळ मदत करावी- कल्पना क्षीरसागर , सरपंच मुंगशी