मुंगशी ग्रामपंचायतीवर सोपल गटाचे वर्चस्व

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

वैराग : बार्शी तालुक्यातील अत्यंत महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या मुंगशी वा ग्रामपंचायतीवर माजी मंत्री दिलिपरावजी सोपल यांच्या गटाचा सरपंच व पाच सदस्य विजयी झाले आहेत. तसेच आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटाला चार जागा मिळाल्या आहेत. माजी सरपंच उमेश क्षीरसागर व काकासाहेब क्षीरसागर यांनी सोपल गटाची धुरा संभाळली विजयी उमेदवार कल्पना सत्यवान क्षीरसागर या एकुण ७५८ विक्रमी मते घेऊन १७९ मतांनी सरपंच पदी विजयी झाल्या आहेत. तर विनोद सुग्रीव तुपेरे २५५ , उज्वला कमला कर खंबे २५४ , अशिष उमेश क्षीरसागर २३६ , अश्विनी रणजित क्षीरसागर २६८, शफिक हुसेन आतार २५६ हे सोपल गटाचे सदस्य विजयी झाले. तर राऊत गटाचे प्रगती क्षीरसागर २७४, रोहीणी क्षीरसागर २६७, अमोल क्षीरसागर २३६ , आशा राक्षे २३६ ह्या विजयी झाल्या. या सर्व उमेदारांचे माजी मंत्री दिलिप सोपल माजी सभापती युवराज काटे , माजी सभापती मकरंद निंबाळकर नागेश अक्कलकोटे श्रीमंत थोरात आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या