अनुसूचित जातीच्या महिलेवर लग्नाचे अमिश दाखवून वारंवार बलात्कार केल्या प्रकरणातील आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 619/2023 नुसार आरोपी विकास पांडुरंग पाटील रा. गादेगाव ता-पंढरपूर याचेवर पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपावरून भा.दं.वि संहिता कलम-376,376(2)(n) नुसार व अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम-1989 अॅट्रोसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला होता. सदर प्रकरणातील आरोपी विकास पाटील याने त्याचे वकिलांमार्फत बार्शी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.
सदरील जामिन अर्जाचे सुनावनी दरम्यान पीडित महिलेने तिचे वकील अॅड.विवेक गजशिव यांचेमार्फत लेखी युक्तिवाद दाखल करून आरोपीचे जामीन अर्जास विरोध केला होता.सदरचा लेखी युक्तिवाद व सरकारी वकील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून मे.अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जयेंद्र जगदाळे साहेब यांनी आरोपी विकास पाटील यांचा जामीन अर्ज नामंजूर करून फेटाळला. या कामी पिडीत महिले तर्फे अॅड.विवेक गजशिव यांनी काम पाहिले तसेच सरकारी वकील अॅड.प्रदीप बोचरे यांनी काम पाहिले.