वृक्ष संवर्धन समितीतर्फे बार्शी पर्यावरण दिनानिमित्त झाडांचा वाढदिवस साजरा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : जागतिक पर्यावरण दिन तसेच वृक्ष संवर्धन समितीच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आज वृक्ष संवर्धन समितीतर्फे सालाबाद प्रमाणे मागच्या वर्षी लावलेल्या झाडांचे वाढदिवस करण्यात आले. मागच्या वर्षी पाच जून रोजी बार्शी तालुक्यातील शहीद झालेल्या जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ झाडे लावली होती. त्या झाडाचे वर्षभर संवर्धन करून आज वृक्ष संवर्धन समितीने शहीद कुटुंबीयांच्या समवेत झाडांचा वाढदिवस साजरा करून समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष चांगदेव सुरवसे,पत्रकार शहाजी फुरडेपाटील, प्रा. शशिकांत धोत्रे, डॉ. प्रशांत मोहिरे तसेच शहीद जवान सुनील काळे, शहीद जवान जयहिंद पन्हाळकर, शहीद जवान अभिमान पवार, शहीद जवान दत्तू शेरखाने, शहीद जवान विठ्ठल खांडेकर यांच्या परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी शहीद पार्क येथील सर्व झाडांना फुगे लावून सर्व परिसर सुशोभित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ध्यास कोचिंग क्लासेस तसेच शारदेय डान्स अकॅडमीच्या बाल मित्रांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी कोकोपीटने तयार केलेला केक शहिदांच्या कुटुंबियांच्या हस्ते कापण्यात आला आणि तो झाडांना टाकण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृक्ष संवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी केले तर सूत्रसंचालन वीरेंद्र भंडे यांनी केले. उदय कुमार पोतदार यांनी सर्व उपस्थिता सोबत झाडासंबंधी प्रार्थना घेतली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वृक्ष संवर्धन समितीच्या सर्व सदस्यांनी कष्ट घेतले शेवटी आभार डॉ. सचिन चव्हाण यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या