भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाचा सलग सोळा वर्षे 100% टक्के निकालाची परंपरा कायम

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : एस.एस.सी. मार्च 2023 परीक्षेत भैरवनाथ माध्यमिक विद्यालय गुळपोळी प्रशालेचा शंभर टक्के निकालाची सलग सोळा वर्षाची परंपरा कायम राहिली. यामध्ये प्रशालेतून परीक्षेला 40 विद्यार्थी बसले होते. यात प्रथम कु. वाघ सुकन्या गोवर्धन 91.60℅ (जामगाव केंद्रात दुसरा) द्वितीय टोणगे नम्रता किसन 90.40℅ तृतीय पवार सायली हरिदास.89.80℅ चतुर्थ मचाले अमर भरत 89.20℅ कु.खंडागळे ऋनिषा संजय 89.20℅ पाचवा कुमारी जाधव स्नेहल संतोष 88.40℅ कुमारी शेख मुस्कान अखिल 88.40℅ यातून 90% च्या पुढे 2 80% च्या पुढे 22 70 टक्के च्या पुढे 12 60% च्या पुढे 4 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

प्रशालेच्या या यशाचे कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अरुण भाऊ कापसे सचिव अभिजीत कापसे सहसचिव प्रमोद देशमुख (संचालक सेकंडरी स्कूल्स एम्पलो को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई)यांच्याकडून कौतुक अभिनंदन झाले आहे. गुळपोळी ग्रामस्थांकडूनही या यशाचे कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रमोद (पप्पू) देशमुख सर यांचेसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या