नांदेडमधल्या निर्घृण खुनाच्या विरोधात बार्शीत वंचित आणि भिम सैनिकांकडून तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पीडित अक्षयच्या कुटुंबियांना 50 लाखांची आर्थिक मदत अन पोलिस संरक्षण द्या
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : महाराष्ट्रातील नांदेड जिल्हयातील बोंढार हवेली या गावामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेराव या युवकाचा निर्घुन खुन करण्यात आला होता. या घटनेचा महाराष्ट्राबरोबर बार्शीतही तहसील कार्यालय येथे निषेध नोंदविण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात , पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या.अक्षय भालेरावची निर्घुन हत्या करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी,सदरील खटला हा फास्टट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा,सदरचा तपास हा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे देण्यात यावा, अक्षयच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात यावे,अक्षयच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने ५० लाखांची आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीचे पत्र बार्शीचे तहसीलदार यांना देण्यात आले.
यावेळी वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष भारत कदम, जिल्हा उपाध्यक्ष अॅड. विवेक गजशिव, बहुजन क्रांती मोर्चाचे तानाजी बोकेफोडे,कामगार नेते अजित कांबळे, अमोल शिंदे, शरद बनसोडे, प्रवीण आखाडे, अशोक आहिरे, इब्राहिम शेख, पांडुरंग घोलप आदींनी घटनेचा निषेध व्यक्त करीत मनोगत केले.
यावेळी , सोनाली गायकवाड, एड.उषा पवार, सत्यजित जानराव, रूपेश बंगाळे, दयावान कदम, किशोर ढोले, किरण कदम, स्वप्निल लंकेश्वर, उडानचे युन्नुस शेख, इरफान शेख, मॅक्स शिंदे, सुहास भालेराव, आनंद चव्हाण, सचिन पालके, विक्की ओहोळ, भैरवनाथ शिंदे, विशाल प्रतापे, सूर्या मस्के, तुळशीराम गायकवाड, सौरभ कांबळे, सुमित खुरंगुळे, दिलीप रिकीबे, पंकज खूने, मनोज शिंदे आदी उपस्थित होते.