सोलापूरच्या राहुलने तयार केलेल्या पार्टचे पेटंट टाटा मोटर्सन घेतलं साडेतेरा कोटी रुपयांना

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सोलापूरच्या युवा संशोधक इंजिनीयरने सोलापूरचा लौकिक वाढवला आहे. चार चाकी वाहन क्षेत्रात त्यानं केलेले पेटंट टाटा कंपनीने तब्बल साडेतेरा कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. पत्रकार परिषदेत राहुल बऱ्हाणपुरे आणि त्यांच्या मित्रमंडळींनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

सोलापूरच्या दिगंबर जैन गुरुकुल प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात त्यानं एम.सी.व्ही.सी ऑटोमोबाईल क्षेत्रात शिक्षण घेतलं .संजय कुरनूरकर, संपत कुमार झळके या शिक्षकांचे त्यांना मार्गदर्शन लाभलं. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यानं पदवी प्राप्त केली. वडील साडीच्या दुकानात कर्मचारी तर आई गृहिणी अशी घरची स्थिती असतानाही जिद्दीन राहुल यांनी सुरुवातीच्या काळात एका खाजगी गॅरेजमध्ये दुचाकी, चार चाकी गाड्या दुरुस्तीचे काम केलं. हे करत असतानाच गाड्यांमध्ये होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी त्याना कल्पना सुचली. यावर त्यांनी अनेक दिवस संशोधन करून चार चाकी गाड्या मधील प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी एक पार्ट बनवला. हा पार्ट इंडियन स्टॅंडर्ड नॉर्म्स नुसार बनवला असून याविषयीची माहिती त्यानी पोर्टलवर प्रसिद्ध केली. तीन ते चार कंपन्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि या पेटंट ची मागणी केली. यातील टाटा मोटर्स कंपनी ही देशी कंपनी आहे आणि टाटा कंपनीचं देश कार्यात नेहमीच अधिक योगदान असतं म्हणून याच कंपनीला त्यात राहुल बुऱ्हाणपूरे यांनी आपलं पेटंट दिलं आहे .सध्याच्या वाहनांमध्ये इ.जी.आर सिस्टमचा वापर केला जातो. या पार्टचं काम प्रभावीपणे होण्यासाठी पीसीएम या सेंसरद्वारे हा पार्ट नियंत्रित केला जातो. सायलेन्सर मधून बाहेर फेकली जाणारी 30% दूषित हवा या पार्टमुळे पुन्हा रिसायकल होऊन इंजिन मध्ये सोडली जाते. यामुळे प्रदूषणात 30 % एवढी घट होईल, याशिवाय इंधनाची ही 10% टक्के बचत होते असं राहुल बुऱ्हाणपूरे यांनी सांगितलं . नायट्रोजन ऑक्साईड कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोकार्बन यासारखे घातक वायू चार चाकी वाहनांमधून उत्सर्जित होतात. त्यातील नायट्रोजन ऑक्साईड हा मानवी शरीरावर घातक असतो. टाटा मोटर्स कडून या नवीन पार्टचा वाहनांमध्ये पुढील वर्षापासून वापर होणार आहे.

पत्रकार परिषदेत उद्योगपती किशोर चंडक, शिक्षक संपत झळके अतुल बावटणकर, बसवराज बऱ्हाणपुरे, माऊली झांबरे, चन्नवीर चिटे आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या