सोलापूर जिल्ह्याच्या विकासार्थ तीर्थक्षेत्र जिल्हा म्हणून घोषित करा – खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत केली मागणी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गतिमान करण्यासाठी सर्वप्रथम लोकसभेत केलेल्या मागणीसह विविध विषयांबाबत खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतली.

खा. डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी मंगळवारी संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेत त्यांना शाल, हार घालून सन्मान केला. याप्रसंगी सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याबाबत विविध विषयांवर चर्चा केली. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

सोलापूर जिल्ह्यातील देवस्थानांची तीर्थक्षेत्राची मोदीजी यांना संपूर्ण माहिती असल्यामुळे केंद्र सरकारने सोलापूर जिल्हा हा तीर्थक्षेत्र जिल्हा घोषित करून तीर्थक्षेत्र व पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा निर्माण करण्याची मागणी केली. या घोषणेमुळे सोलापूर जिल्ह्याचा विकास अधिक गतिमान होणार असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे
सोलापूर येथे टेक्सटाईल पार्क देण्याबाबत पुन्हा एकदा पंतप्रधानांकडे विनंती केली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या