दूध विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थ तयार केल्यास मूल्य वाढते , आळणी कृषी महाविद्यालयाचा उपक्रम

B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत कृषी महाविद्यालय आळणी येथील आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी मॉड्युल कार्यक्रमाअंतर्गत दुधापासून विविध पदार्थ बनविले. पनीर, खवा, श्रीखंड, बर्फी ,गुलाबजाम, पेढा, कुल्फी, आईस्क्रीम, लस्सी ,रसगुल्ला हे दुग्धजन्य पदार्थ विद्यार्थ्यांनी करून दाखवले आणि त्याची विक्री केली. दुग्ध व्यवसाय हा शेतीस पूरक असा जोडधंदा आहे. बऱ्याच लोकांचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे.सध्या दुधाला व दुग्धजन्य पदार्थांना प्रचंड मागणी आहे.फक्त दूध विकण्यापेक्षा त्यावर प्रक्रिया करून दुग्धजन्य पदार्थ तयार केल्यास दुधाचे आर्थिक मूल्य कित्येक पटीने वाढते.
अंतिम सत्राचे विद्यार्थी अलापुरे अमोल, राऊत पृथ्वीराज, कांबळे ओंकार, दाणे हरीष,शेख रफी, कंगणे तुकाराम, नायकल कृष्णा ,सुपेकर चैतन्य, भुतेकर संदेश, दराडे सुजीत, नागेंदर रेड्डी, एम. प्रदीप, महेश्वर रेड्डी, साबळे स्नेहल, बरगले सोनाली, मेसे कोमल यांनी दुधापासून विविध पदार्थ कसे बनवायचे, बनविलेले पदार्थ कसे व त्यापासून नफा कसा मिळवायचा या विषयीचे मार्गदर्शन प्रा. एस. ए.दळवे यांच्याकडून घेतले.संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पदार्थांचे कौतुक केले. प्राचार्य डॉ.क्रांती कुमार पाटील,प्रा.के.ए.बुरगुटे, डॉ. ए. ए. गांधले, प्रा. एस. एन. साबळे,यांचे देखील विशेष मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले.