बार्शी शहर पोलीसांची दमदार कामगिरी पिकप गाडीसह ११,६९,०००/- रू चा गुटखा जप्त

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी / सोलापूर : बार्शी शहरातील बालाजी कॉलनी, सोलापूर रोड येथुन पिकप गाडी नंबर एम.एच.४३ ए. डी. ९७८८ या गाडीमधुन महाराष्ट्र प्रतिबंध असलेल्या गुटख्याची अवैधरित्या वाहतुक होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा लावण्यात आला. काही वेळातच पिकप गाडी तेथे आली त्या गाडीला थांबवुन ड्रायव्हरला त्याचे नाव व पत्ता विचारले त्यावेळेस त्यांनी त्याचे नाव अशपाक जवाहर अत्तार वय ३० वर्षे रा. मालवंडी ता. बार्शी जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. गाडीमध्ये काय आहे विचारले असता त्याने गाडीमध्ये सुगंधीत राजनिवास पान मसाला असल्याचे सांगितले. सदर पिकप गाडी तपासली असता त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंध असलेला ७,६९,०००/- रू चा सुगंधीत राजनिवास पान मसाल्याचे २० पोती त्यामध्ये ४००० पुडे मिळून आल्याने अशपाक अत्तार यास ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या इसमास सदरचा गुटखा कोठुन आणला तो कोठे विक्री करीता घेवुन जात आहे याबाबत चौकशी केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. सदरचा गुटखा मिळले बाबत मा. सहा. आयुक्त साो. अन्न व औषध प्रशासन, सोलपूर विभाग यांना कळवुन त्याप्रमाणे आरोपी विरुध्द बार्शी शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम १८८, २७२, २७३,३२८ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ चे कलम ५९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर उदार हे करीत आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक, शिरीष सरदेशपांडे सो अपर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव सो, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल सो यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, संतोष गिरीगोसावी, सहा. पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, सहा. पोलीस निरीक्षक, ज्ञानेश्वर उदार,सहा. पोलीस उपनिरीक्षक अजित वरपे, पोहेकॉ/६६५ रेवणनाथ भोंग, पोहेकॉ/३०४ शैलेश चौगुले, पोना/११६२ मनिष पवार, पोना / १६६७ अमोल माने, पोना / ९१२ वैभव ठेंगल, पोना / संदेश पवार (एसडीपीओ ऑफीस बार्शी) पोकॉ/१७४८ ज्ञानेश्वर घोंगडे, पोका / २१११ अंकुश जाधव, पोकॉ/८५६ अर्जुन गोसावी, पोकॉ/१९७४ सचिन देशमुख, पोकॉ/ ७८७ अविनाश पवार, पोकॉ/ ४५७ रवी लगदिवे, रतन जाधव सायबर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण यांनी केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या