डॉ. सुग्रीव श्रीमंत गोरे राष्ट्रीय आदर्श प्राचार्य पुरस्काराने सन्मानित

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव या संस्थेने शिक्षणशास्त्र महाविद्यालय बार्शीचे प्राचार्य डॉ.सुग्रीव गोरे यांना राष्ट्रीय आदर्श प्राचार्य पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित केले. गणपत पारसेकर कॉलेज ऑफ एज्युकेशन हरमल, गोवा येथे त्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रीय आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर श्रीमती रत्नमाला सावुनुर केंद्रीय मंत्री भारत सरकार दिल्ली, महेश मेघनावर एस.पी. कर्नाटक राज्य, राजू शिंगाडे महापौर कोल्हापूर महानगरपालिका, अमरसिंह पाटील खासदार बेळगावी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, अभिनंदन पत्र व सन्मानपत्र देऊन प्राचार्य डॉ. गोरे यांना सन्मानित करण्यात आले. प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे गेली 25 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देत आहेत. त्यांनी महाविद्यालयात राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदा, कार्यशाळा व परिसंवादाचे यशस्वी आयोजन करून शैक्षणिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले आहे.
त्याचप्रमाणे वृक्षारोपण व संवर्धन राष्ट्रीय मतदान जाणीव जागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, महिला सबलीकरण या संदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक चळवळीला चालना दिली. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत साक्षरता,जलसंधारण, महिला बचत गट,स्वच्छता अभियान, आरोग्य विषयक जनजागृती, नवकृषी तंत्रज्ञान,आपत्ती निवारण इत्यादी संदर्भात कार्यशाळा आयोजित करून ग्रामीण भागातील जनतेचे उद्बोधन केले आहे. महाविद्यालयातील मुली व महिला कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्यासाठी स्वसंरक्षण कार्यशाळा, कायदेविषयक तज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करून ठोस असे उपक्रम राबविले आहेत.
महाविद्यालयात बी.एड., बी.पी.एड., एम.पी. एड., एम.एड., एम. ए. एज्युकेशन, डी. एस.एम., पीएच.डी.संशोधन केंद्र, इ. अभ्यासक्रम सुरू आहेत. या प्रत्येक विभागांच्या निकालाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे. विद्यापीठ परीक्षांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी प्रतिवर्षी अव्वल क्रमांकावर राहिले आहेत. क्रीडा क्षेत्रात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान कामगिरी बजावली आहे. राज्य ,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अव्वल क्रमांक प्राप्त केले आहेत. सामाजिक भान असणारे शिक्षक निर्मितीसाठी विविध प्रात्यक्षिके व कार्यशाळांचे यशस्वी नियोजन व आयोजन करून समाजाला उत्कृष्ट सामाजिक भान असणारे शिक्षक दिले, की ते देशाच्या कानाकोपऱ्यात उत्कृष्ट शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, क्रीडा अधिकारी म्हणून आपला ठसा उमटवत आहेत.

ही महाविद्यालयाच्या दृष्टीने गौरवास्पद बाब आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडली आहे. एक दर्जेदार शिक्षण शास्त्र महाविद्यालय म्हणून त्याच्या लौकिकात वाढ होत आहे. त्यामुळे महाविद्यालयाचा शासकीय व निमशासकीय संस्थानी यथोचित गौरव केला आहे. ही बाब सुखावणारी आहे. प्राचार्य डॉ. सुग्रीव गोरे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील 60 शैक्षणिक परिषदा, कार्यशाळा यामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक मासिका मधून जवळपास 50 संशोधन लेख प्रकाशित झाले आहेत. शिक्षण क्षेत्रातील 9 शैक्षणिक ग्रंथाचे लेखन केले आहे. 11 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. व 12 विद्यार्थ्यांनी एम.फिल. या पदव्या संपादन केल्या आहेत. या त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन सन 2019 मध्ये सोलापूर विद्यापीठाने त्यांना आदर्श प्राचार्य पुरस्कार प्रदान केला. त्याचप्रमाणे विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले . राष्ट्रीय आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी. वाय. यादव , उपाध्यक्ष नंदन जी जगदाळे , सचिव पी. टी. पाटील, सहसचिव अरुण देबडवार व खजिनदार श्री.बापूसाहेब शितोळे संस्थेचे कार्यकारिणी सदस्य, विश्वस्त यांनी तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या