अमेरिकेच्या दूतवास सदस्यांनी दिली महापालिकेला भेट आणि जाणून घेतला महापालिकेचा कामकाज
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : महानगरपालिकेला आज अमेरिकेचे दूतावास सदस्यांनी भेट दिली. यावेळी सदस्यांनी इंद्रभवन इमारतीची कौतुक केलं. यावेळी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली-उगले यांनी इंद्र भवन इमारत हेरिटेज इमारत असून त्या संदर्भात संपूर्ण माहिती दिली.तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सुविधा त्यामध्ये ड्रेनेज, रस्ते, पाणीपुरवठा, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, महापालिकेच्या बचत गट आदी कशा पद्धतीने कामकाज करतात या संदर्भात अमेरिकेच्या दूतावास यांना माहिती दिली. तसेच सांस्कृतिक देवाण-घेवाण,राजकारण, समाजकारण या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी अमेरिकेचे वाणिज्य दूतावास यांनी त्यांच्या शहराबद्दल विविध माहिती आयुक्तांना दिली. यावेळी आयुक्त यांच्यासह अमेरिकेचे दूतावास यांनी इंद्र भवनाची पाहणी केली. यावेळी वाणिज्य दूतावासाचे सदस्य रॉब अँडरसन, नेरिसा कॅस्टेलींनो, ब्रॅडां सोया, लिंमीतर किका, तेजस्विनी करालकर माजी महापौर शोभा बनशेट्टी युवा मोर्चाचे वृषाली चालुक्य माजी नगरसेविका संगीता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.