महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभार्थ्याना आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
उस्मानाबाद – महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदत पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयां पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेची अंमलबजावणी सुरु केली आहे. जिल्हयातील 406 गावांतील 5 हजार 117 लाभार्थी शेतकऱ्यांची तिसरी यादी दि.15 मार्च 2023 रोजी योजनेच्या पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आली आहे.या याद्या गांवांतील महा-ईसेवा केंद्र,एस.सी.सेंटरवर उपब्ध आहेत.योजनेचा लाभ मिळण्याकरीता शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. तरी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी महा-ई सेवा केंद्र,सी.एस.सी. सेंटर किंवा बँक शाखेत जावून आपले आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे व योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.