जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता युवा काँग्रेसची राकेश नवगिरे यांचे तहसीलदार यांना निवेदन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : राजस्थान राज्यात मुख्यमंत्री अशोकजी गेहलोत व त्यांच्या सरकारने राजस्थान राज्यातील १ जानेवारी २००४ रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागू केली आहे. जुनी पेंशन लागू नसल्यामुळे राज्याचे प्रशासन सांभाळणाऱ्या नवीन कर्मचाऱ्यांना आपल्या सेवा निवृत्ती नंतर वृद्धापकाळातील जिवनज्ञापनाबाबत अतिशय असुरसक्षितता वाटत असून त्यांच्यात निर्माण झालेली असुरसक्षितता दूर करून त्यांना जुन्या पेंशन चे सर्व लाभ देण्याचा निर्णय राजस्थान राज्य सरकारने घेतला असून ज्यामुळे शासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी असल्याचा आत्मविश्वास तेथील कर्मचाऱ्यांच्या निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्यात दि.01. नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनचे सर्व लाभ बंद करण्यात आले आहेत .यातल्या त्यात त्यांना लागु करण्यात आलेल्या नविन पेन्शन योजनूतुन त्यांना मृत्यु व सेवानिवृत्ती नंतर कोणतीही पेन्शन मिळताना दिसत नाही .त्यामुळे राज्यातील असंख्य कर्मचाऱ्यांना त्यांच्या मृत्यु व सेवानिवृत्तीनंतरच्या जीवनत पनाबाबत अतिशय असुरक्षितता निर्माण झाली आहे . ज्यातून कर्मचाऱ्यांना शासन विषयी असंतोष वाढत आहे, यामुळे महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना सुद्धा राजस्थान सरकार प्रमाणे जुन्या पेन्शनचे सर्व लाभ लागु करुन त्याचे मृत्यू व सेवानिवृत्ती नंतरचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी तहसीलदार साहेब बार्शी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले आहे.महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. कुणाल दादा राऊत यांच्या आदेशानुसार व सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले, निवेदनात म्हटले आहे की शासनाच्या सेवेत दि.01. नोव्हेंबर 2005 रोजी व त्यानंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचे सर्व लाभ पूर्ववत लागु करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेवून, राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित व उज्ज्वल करावे अशी मागणी करण्यात आली आहे.