नळदुर्गला लवकरच अपर तहसील कार्यालय !

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

तुळजापूर : नळदूर्ग व परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नळदूर्ग येथे अपर तहसिल कार्यालय मंजुर करण्याची मागणी पूर्णत्वास जात असून याबाबत लवकरच निर्णय घेण्याचे आश्वासन महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी तुळजापूरच्या शिष्टमंडळाला दिले आहे. दि.०९ /०३/ २०२३ रोजी आपल्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुक्याच्या शिष्टमंडळाने महसुल मंत्री विखे पाटील साहेबांची यांची भेट घेतली होती. तुळजापूर तालुक्यात १२३ गावांसह अनेक तांडे व वस्त्या आहेत. याशिवाय २ शहरे असून तालुक्याचे भौगोलिक क्षेत्र १,४६,००९.९२ हेक्टर आहे. मोठे भौगोलिक क्षेत्र व गाव, तांड्याची संख्या विचारात घेता नळदूर्ग हा नवीन तालुका करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. मागील ३ वर्षांपासून याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारने अनेक दिवस हा प्रस्ताव रेंगाळत ठेवला होता.नळदूर्ग शहराला प्राचीन इतिहास असून पुणे-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील या शहरातून अनेक गावांचा दैनंदिन व्यवहार चालतो. तालुक्यातील काही गावे तुळजापूर पासून ५० कि.मी पेक्षा जास्त अंतरावर आहेत. त्यामुळे शासकीय कामे व योजनांसाठी नागरिकांना मोठा त्रास होतो.परंतू राज्यातील इतर ठिकाणच्या मागण्या व सदरील कामासाठी लागणारी मोठी आर्थिक तरतूद यामुळे नवीन तहसील मंजुरीला वेळ लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन परिसरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तूर्तास अपर तहसील कार्यालय सुरु करण्याची मागणी आपण शिष्टमंडळाच्यासह केली होती. मा.विखे पाटील साहेबांनी ही मागणी मान्य करत लवकरच नळदुर्ग येथे अपर तहसील सुरु करण्याचे शिष्टमंडळाला आश्वासित केले. त्याबद्दल शिष्टमंडळाने त्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.तथापि, नळदुर्ग येथे तहसील सुरु करण्याची मागणी कायम असून यासाठी पुढेही सातत्याने पाठपुरावा केला जाणार आहे. याप्रसंगी आमदार ज्ञानराज चौगुले, भाजपा धाराशिवचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दत्ताभाऊ कुलकर्णी, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे, जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. दिपक आलुरे, मजूर फेडरेशन चेअरमन नारायण नन्नवरे, गुलचंद व्यवहारे, धनंजय गंगणे, सज्जन जाधव आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या