कुटुंब हे सर्वात मोठी संपत्ती आहे : डॉ. विठ्ठल लहाने
B1न्यूज मराठी नेटवर्क
जय शिवराय प्रतिष्ठानच्या शिवकार्य २०२३ च्या पुरस्काराचे वितरण
बार्शी : शिवजन्मोत्सवानिमित्त व जय शिवराय प्रतिष्ठानच्या वर्धापनदिनानिमित्त संघटनेच्या वतीने व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे व शिवकार्य पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी व्याख्याते म्हणून विश्वप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठल लहाने सर उपस्थित होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ. बी. वाय. यादव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विरोधी पक्षनेते यांचे स्वीय सहाय्यक, सनदी अधिकारी अविनाश सोलवट , सहाय्यक वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय डॉ. सौ. शितल बोपलकर, प्रमुख उपस्थिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन रणवीर (भैय्या) राऊत, मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय संतोष ठोंबरे, श्री. शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख हे उपस्थित होते. यावर्षी जय शिवराय प्रतिष्ठानचा शिवकार्य पुरस्कार हा रुग्णसेवेसाठी देण्यात आला होता. यामध्ये जगदाळे मामा हॉस्पिटल, सुश्रुत हॉस्पिटल व सोमाणी हॉस्पिटल यांना यावेळेसचा शिवकार्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी या हॉस्पिटलचे डॉ. संजय अंधारे डॉ. योगेश सोमाणी डॉ. रामचंद्र जगताप हे उपस्थित होते. यावेळी हॉस्पिटल मधील सफाई कामगारांपासून सिक्युरिटी गार्ड, स्टाफ कंपाउंडर, नर्सेस या सर्व ५०० रुग्ण सेवकांचा एकत्रित सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला व्याख्याते म्हणून लाभलेले डॉ. विठ्ठलराव लहाने सर यांनी आपल्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेत बदलत चाललेला युवक व कुटुंब व्यवस्थापन या विषयावर व्याख्यान देत असताना कुटुंबाबद्दलचे महत्त्व व युवकांमध्ये बदलत चाललेल्या गोष्टी यावर अतिशय सुंदर असं व्याख्यान देऊन सभागृहात उपस्थित असणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केल. लहाने सरांनी आपल्या कुटुंबामध्ये कशा प्रकारचे आनंदी वातावरण असले पाहिजे, आपलं कुटुंब कशा पद्धतीने आनंदी राहू शकते आई वडील व कुटुंबातील सदस्यांवर आपण कशा पद्धतीने व किती प्रेम केलं पाहिजे हे सांगताना डॉक्टर साहेबांचे आणि समोरील असंख्य रसिक श्रोत्यांचे डोळे पाणावले.याच बरोबर युवकांनी टेक्नॉलॉजीचा वापर करत असताना कुटुंबाशी आपली नाळ कशी जोडून ठेवली पाहिजे यावरही प्रभावी मार्गदर्शन डॉक्टर साहेबांनी केले. यावेळी यशवंतराव चव्हाण सभागृहांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये श्रोतावर्ग उपस्थित होता. सभागृह पूर्ण भरून सभागृहा बाहेर टीव्ही स्क्रीनवर देखील या कार्यक्रमाचा लाभ अनेक श्रोत्यांनी घेतला. डॉक्टर साहेबांनी जय शिवराय प्रतिष्ठानच्या कार्यचं देखील कौतुक करून आशा युवकांमध्ये समाजाबद्दलची जाण आणि समाजाबद्दल काम करण्याची उर्मी असते अशी भावना व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणाऱ्या डॉ.यादव साहेबांनी देखील संघटनेच्या कार्याचे कौतुक करत अशीच नवीन पिढी घडली पाहिजे अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाला बार्शी शहरातील सर्व स्तरातील श्रोता वर्ग उपस्थित होता. तसेच महिलांची संख्या लक्षणिय होती. या कार्यक्रमांमध्ये जय शिवराय प्रतिष्ठानच्या कार्याचा माहितीपट सादर करून पुढील वर्षात करण्यात येणाऱ्या कार्याची देखील माहिती सांगण्यात आली. २०२३ हे वर्ष संघटनेच्या वतीने रुग्णसेवेसाठी समर्पित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय राऊत यांनी केले. तर सूत्रसंचालन मंगेश दहीहंडी यांनी केले. कार्यक्रमासाठी परिश्रम कार्याध्यक्ष मनोज मोरे, कार्यउपाध्यक्ष बाबासाहेब बारकुल, कार्यसचिव अमित नागोडे, संघटनेचे प्रमुख सदस्य सुमित नाकटीळक, गणेश वाणी, अमोल वाणी, सुहास गुंड, किरण नान्नजकर, संकेत वाणी, गणेश हांडे, वैभव विधाते, राहुल काळे, अक्षय अंबुरे, संपतराव देशमुख, ऋषिकांत पाटील, राहुल वडेकर, अविनाश वैद्य, कृष्णा परबत, कुलदीप परबत, राहुल जाधव, सुबोध पाटील, गुरु कोल्हाळे, विशाल कोटगुंड, अनिल शेलार, सुनील शेलार, संदेश भोंडे, अजित पाटील, माधव जाधव, राहुल शिंदे, अंबऋषी गायकवाड, आकाश तावडे, गणेश पन्हाळकर, निखिल गरड, योगेश पन्हाळकर, सक्षम तावडे, सागर क्षीरसागर, सागर पवार, दीप उपळकर, सागर माने, अमित चव्हाण, सुरज वाणी, वैभव गात, विनित नागोडे , महेश राऊत, विनायक हांडे, श्रीधर हांडे, सर्व सदस्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.