नाभिक दुकानदार संघाच्या अध्यक्षपदी अभयकुमार कांती याची बिनविरोध निवड

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : संत सेना नाभिक दुकानदार संघ सेवाभावी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा सोलापूर ऑफिसर क्लब समोरील इंपिरियल हॉल मध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. गत पन्नास वर्षांहूनही अधिक काळापासून बिनविरोध निवड करण्याची परंपरा यंदाही कायम राहिली. मनोहरमामा क्षीरसागर, चंद्रमोळी तमनुर,पंडित येळगे, संजय जोगीपेटकर, आनंद सिंगराल आदी समाजातील ज्येष्ठ धुरिणांच्या उपस्थितीत आणि देखरेखीखाली एकमताने नूतन पदाधिकारी निवडण्यात आले. ते पुढील प्रमाणे..
अध्यक्ष:अभयकुमार काती
उपाध्यक्ष शेखर कोडापूरे
सचिव:मोहन जमदाडे

खजिनदार : शिवकुमार हडपद मुरली पदिला गोपाल नडीगुडू राम राऊत राजू हडपद निवड झाली आहे.
आजवरच्या वाटचालीत संस्थेने केलेल्या भरीव कामगिरीचा उल्लेख करीत नवनिर्वाचि अध्यक्ष अभयकुमार कांती म्हणाले, “आगामी काळात देखील सर्वांना भूषणावह वाटेल अशीच कारकीर्द आमची कारकीर्द राहील. सद्य परिस्थिती लक्षात घेउन ग्राहकांनाही दिलासा मिळावा या हेतूने दाढीचे दर स्थिर (पूर्विचेच) ठेवत फक्त 100 कटिंगच्या दरात वाढ सुचविण्यात आली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत दरवाढीचा निर्णय झाला. त्याप्रमाणे ग्राहकांना उत्तम सेवा देता यावी म्हणून करागिरांसाठी मुंबई, पुणे, बेंगलोर इ. ठिकाणच्या तज्ञांचे सेमिनार आयोजित केले जातील, दुकानदार बंधूसाठी गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळवून देणे व तसेच संस्थेला कायम स्वरुपी कार्यालय असावे यासाठी आम्ही सर्व ते प्रयत्न करू.” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या