माजी पोलीस महानिरक्षक, राज्य मानवाधिकार उपाध्यक्ष, पोलीस Mat न्यायालय उपाध्यक्ष प्रविण दिक्षित यांची बार्शीतील शाह रक्तपेढीस सदिच्छा भेट

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या इंडीयन रेडक्रॉस सोसायटीच्या मानवतावादी कार्याला साजेशी कामगिरी रेडक्रॉसच्या बार्शी शाखेने केल्याचे गौरवोदगार राज्य मानवाधिकार आयोगाचे सदस्य तथा माजी पोलीस महानिरीक्षक प्रवीण दिक्षित यांनी काढले. मंगळवारी (ता.17) सकाळी बार्शीचे ग्रामदैवत श्री.भगवंताचे दर्शन घेऊन इंडीयन रेडक्रॉस सोसायटी संचलीत बार्शीच्या श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीला सदिच्छा भेट दिल्यानंतर दिक्षीत यांचा रेडक्रॉसचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांनी शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यानंतर सत्काराला उत्तर देताना दिक्षीत म्हणाले, बार्शी सारख्या निमशहरी भागात मागील चार दशकाहून अधिककाळ ऐच्छिक रक्तदान चळवळ घरोघरी पोहचविण्याचे काम रेडक्रॉसच्या बार्शी शाखेने अतंत्य तळमळीने व जिद्दीने केले आहे. रक्तदान चळवळी बरोबरच समाजातील वंचितांना बधिर मूक शाळेच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे महत्वपूर्ण संस्थेने केले असून नैसर्गिक आपत्तीत गरजूं पर्यंत मदत पोहचविणारी राज्यातील एकमेव संस्था ठरली आहे. आपदकालीन परिस्थिती असो कि कोरोना महामारी या नाजूक परिस्थितीत संस्थेने मानवतावादी दृष्टीकोन ठेवत गरजूंना कोरोना पिडीतांना मदतीचा हात देत कुटूंबियांना संकटसमयी धीर देण्याचे विधायक काम केले आहे. आज रक्तपेढीत आधुनिक तंत्रज्ञान व अद्ययावत उपकरणे असून त्याचा लाभ रूग्णांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.
प्रास्ताविकात अजित कुंकूलोळ यांनी रेडक्रॉस सोसायटी बार्शी शाखेच्या कार्याचा आढावा सादर केला. भविष्यातही रेडक्रॉस सोसायटीच्या माध्यमातून बार्शी व परिसरातील गरजूंना आवश्यक मदत दिली जाईल अशी ग्वाही दिली. यावेळी अशोक डहाळे, अॅड.विजय कुलकर्णी, प्रशांत बुडूख, अनिल देशपांडे, शिरसीकर उपस्थित होते.