आंदोलनबार्शी

बार्शी उपसा सिंचन उर्वरित कामाच्या कार्यवाहीबाबत अधिकाऱ्यासमवेत बैठक

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : उपसा सिंचन योजनेच्या उर्वरित कामासाठी आमदार राजाभाऊ राऊत यांचा पाठपुरावा सुरू असुन लवकरच रखडलेल्या कामाला सुरुवात होणार आहे. या अनुषंगाने आज सोलापूर येथे आमदार राजाभाऊ राऊत यांनी बार्शी उपसा सिंचन योजनेच्या तावडी तलाव, खामगाव, ढाळे पिंपळगाव तलावात पाणी सोडण्याच्या उर्वरित कामाच्या कार्यवाही संदर्भात सोलापूर येथील भिमा कालवा मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली तसेच आवश्यक ती कार्यवाही लवकरात लवकर पुर्ण करावी असे अधिकाऱ्यांना सांगितले..
बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वकांक्षी असलेली बार्शी उपसा सिंचन योजना पूर्ण व्हावी व तालुक्यात हरित क्रांती घडावी यासाठी आमदार राजाभाऊ राऊत हे शासन दरबारी सतत प्रयत्नशील आहेत.ही योजना पूर्ण झाल्यानंतर तालुक्यातील जवळपास १२ हजार ५५० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत रखडलेली ही उपसा सिंचन योजना पूर्ण करण्याचा आमदार राजाभाऊ राऊत यांनी चंग बांधला असुन त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.
या बैठकीला डी.ए.बागडे साहेब अधीक्षक अभियंता, एस.के. होनखांबे साहेब उप अभियंता, स्नेहलता गावडे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button