आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते गुळपोळी येथे उंच टाकीचे आणि विहीर पाईपलाईनचे भूमिपूजन

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : जलजीवन मिशन अंतर्गत गुळपोळी गावाला 1 कोटी 8 लाख 46 हजार 945 रु कामाला मंजुरी मिळाली आहे. पिण्याच्या पाण्याची उंच टाकी 1 लक्ष 10 हजार लिटर , तर विहीर 50 फूट खोल , विहीर पासून ते उंच टाकी पर्यत 6 किलो मिटर पाईप लाईन , गांव अंतर्गत 2 किलोमीटर पाईप लाईट मंजूर आहे. या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला.बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथे नवीन पिण्याच्या पाण्याची उंच टाकीचे व विहीर पाईप लाईनचा भूमिपुजन बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी अनिल काका डिसले पंचायत समिती सभापती , पॅनल प्रमूख श्रीकांत मचाले , उद्योगजक दिलीप गांधी, संतोष दादा निंबाळकर , विलास रेणके , कृष्णा चिकणे, विनायक डोईफोडे , बाबासाहेब काटे, गणेश शिंदे , अमोल नरखडे , बाळकृष्ण काळे, आण्णासाहेब चिकणे , नानासाहेब पाटील , संतनाथ खंडागळे , काशीनाथ शेळके, भाऊसाहेब काशीद , बाजीराव मोहिते , नटराज मुळे , भारत ताकभाते , पिंटू नाना लोंढे , संतोष मोरे, अनिल मचाले , बाळासाहेब चिकणे, कैलास काळे, आप्पा काळे विविध मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला.
उजणीचे पाणी गुळपोळी , तुर्कपिपरी , श्रीपतपिपरी, मालवंडी , सुर्डी , रस्तापूर या गावांना शेतीसाठी पाणी मिळावे जेणे कडून शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी , तसेच शेतकरी कुटुंबातील तरुण मुलांनी योग्य वयात लग्न होण्यास मदत होईल , पशुपालन व सेंद्रिय शेतीला चालना मिळावी, येत्या तीन वर्षात याठिकाणी उजणीचे पाणी आणणार असे आमदारांनी आश्वासन दिले आहे , ठोस कार्यवाही करणार असल्यामुळे गुळपोळी ग्रामस्थ गावाच्या विकासासाठी आम्ही सर्व आमदार राजेंद्र राऊत यांच्या पाठीमागे उभे राहलो आहे , आमचा सर्वाचा पाठींबा आहे , गावांच्या विकासा करिता वरील सर्व मागण्या मान्य केल्यामुळे आम्ही आमदार राजेंद्र राऊत यांच्या गटात प्रवेश केला आहे. असे पॅनल प्रमुख श्रीकांत मचाले बोलत होते.
गावा गावातील भांडण तंट्यामुळे खेड्यांचा विकास थांबला असून त्यामुळे गावांच्या विकासाला खीळ बसली आहे. गावातील एक गट चांगला काम करत असला की दुसरा गट त्याला विरोध करतो. गावातील लोकांनी भांडण तंटे विसरून गावच्या विकासासाठी एकत्र यावे, असे झाले तरच खऱ्या अर्थाने गावचा विकास होईल तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांनी चिंता करू नये कारण मी तालुक्यात शंभर टक्के पाणी आणल्याशिवाय राहणार नाही. तसेच शेतकरी बांधवांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे राजाभाऊंनी सांगितले.
आमदार राजाभाऊ राऊत यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बार्शी शहर व तालुक्यात शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून कोट्यावधींची कामे चालू आहेत व भविष्यातही मोठ्या प्रमाणात विकास कामे होणार आहेत.
विविध मान्यरांचे सत्कार ग्रामपंचायतीच्या वर्तीने करण्यात आले. त्याच बरोबर विविध मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. त्यावेळी गुळपोळी पंचकोशीतील नागरिक , ग्रामपंचायत सरपंच , उपसरपंच , सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तवना सुत्रसंचलन समाधान चिकणे तर आभारप्रदर्शन कृष्णा चिकणे यांनी मानले.