तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे-देहूकर यांचा श्री भगवंत आरती मंडळ तर्फे सन्मान

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे तेरावे वंशज आदरणीय गुरुवर्य ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे-देहूकर यांचा श्री भगवंत आरती मंडळ तर्फे नुकताच यथोचित सन्मान करण्यात आला. ते बार्शीमध्ये श्रावण मासानिमित्त सुरु असलेल्या ह .भ.प .बोधले महाराज यांच्या प्रवचनमालेस भेट देण्यासाठी भगवंत मंदिरामध्ये आले होते.
यावेळी आरती मंडळाचे सुनील माने , शिरीष अण्णा जाधव, सोमनाथ पवार, रमेश निकम, गणेश ढेपे ,आर बी कुलकर्णी, पांडुरंग गपाट ,जालिंदर ताकभाते, सौदागर ताकभाते , केशव पिंगळे , नारायण सुत्रावे , सुदाम कोकाटे, ठोकळ , अर्जुन चौधरी , गणेश झाडे, चौधरी ताई , रुक्मिणीताई धनुर ताई ,पांडुरंग बडवे, महादेव साळुंखे , दादा राऊत सुरवसे ताई , माळी मावशी, अशोक महाराज, सोमा पिसे, कुणाल शिंदे, पत्रकार नंदकुमार ऊर्फ रवींद्र माढेकर, नागेश जाधव, महेश राऊत ,कुणाल शिंदे, निखिल सगरे, अमोल ठोंगे , बाप्पा कदम ,अण्णा मनसाखरे माऊली जगताप ,वीरेंद्र भंडे ,अक्षय शिंदे, आदी आरती मंडळातील सदस्य तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.