गुळपोळी येथे श्री भैरवनाथ यात्रा उत्सवाचे आयोजन; २ एप्रिलपासून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

0

गुळपोळीच्या श्री भैरवनाथ यात्रेला गुरुवार पासून प्रारंभ, शुध्द चैत्र पोर्णिमेला श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेला सुरवात50000

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

​बार्शी : बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सव गुरुवार, दिनांक २ एप्रिलपासून मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. श्री भैरवनाथ (जोगेश्वरी) यात्रेला गुरुवार पासून प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातुन आणि महाराष्ट्रात तीर्थक्षत्र म्हणून गुळपोळी या गावाला ओळखले जाते. श्री भैरवनाथाचा आवतार महादेवाचा आहे. ५ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या चार दिवसीय उत्सवात धार्मिक विधींसोबतच करमणुकीच्या आणि खेळांच्या भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.5000चैत्र पोर्णिमेला दिवशी मध्य रात्रि पासून श्री भैरवनाथ देवाला पुरण पोळीचा नैवद्य देऊन त्यावेळेपासून यात्रेला प्रांरभ होतो. सकाळी 9 वाजता गुळाच्या शेरणी देवास निहिण्यास सुरुवात होते. ते दिवसभर चालू असतात. गाजत भैरवनाथची काठी घेऊन शेरण्या निहिल्या जातात. सायंकाळी आरती भैरवनाथाची केली जाते. त्यावेळी गावातील भाविक ग्रामस्थ बाहेर गांवाहुन आलेले लोक आरतीसाठी उपस्थित मोठया संख्येने भैरवनाथ मंदिरात असतात. अनेक दिवसांपासून दररोज आरती श्री भैरवनाथ मंदिरात केली जाते. सध्या दररोज मंदिरात महाप्रसाद वाटप केला जातो. प्रसाद घेण्यासाठी मंदिरात भाविक भक्तांची मोठी गर्दी असते.5000दुसऱ्या दिवशी सायंकाळी मानाची काठी मानकरी मालवंडीहुन घेऊन भाविक गुळपोळी येतात. आणि कोरफळे गावातील भाविकाना आबीलचा गाडा किवा माठ दिला जातो. ते शुध्दा भक्ति भावाने गुळपोळीच्या भैरवनाथ (जोगेश्वरी ) देवाच्या दर्शनाला लोक येतात.50000

​यात्रेचे सविस्तर नियोजन खालीलप्रमाणे असेल:
​कार्यक्रमांची रूपरेषा:

​२ एप्रिल २०२६: सकाळी ६ वाजता ‘हनुमान जन्मोत्सव’ सोहळा पार पडेल. त्यानंतर सकाळी १० वाजता ‘शेरणी’चा कार्यक्रम होईल. सायंकाळी ७ वाजता भाविकांच्या मनोरंजनासाठी ‘धुमधडाका’ ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला आहे.

​३ एप्रिल २०२६: सकाळी ७ वाजता कोरफळे ते गुळपोळी असा भव्य ‘रथोत्सव महोत्सव’ निघणार आहे. रात्री ९ वाजता छबीना आणि सोंगांचा पारंपारिक कार्यक्रम सादर केला जाईल.

​४ एप्रिल २०२६: दुपारी ३ वाजता मल्लांच्या कौशल्याने रंगणारे ‘जंगी कुस्ती मैदान’ भरवण्यात येणार आहे. यात नामवंत मल्ल सहभागी होणार आहेत.

​५ एप्रिल २०२६: यात्रेच्या सांगता दिनी सायंकाळी ७ वाजता ‘नादखुळा’ ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे.

​”माझं गांव… माझी यात्रा…” या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन समस्त ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत करण्यात येत आहे.500000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या