उद्घाटनमहाराष्ट्रसोलापूर

जेष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरेंची प्रार्थना फाऊंडेशनला भेट

विषमुक्त सेंद्रिय शेती प्रकल्पाचे केले उद्घाटन; स्वतः पहिले ग्राहक बनून भाजीपाला खरेदी

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

सोलापूर : प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून मोरवंची (जि. सोलापूर) येथे अनाथाश्रम व वृद्धाश्रम चालविण्यात येत असून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुले, वंचित, अनाथ, निराधार तसेच भिक्षा मागणाऱ्या मुलांचा आणि अनाथ, निराधार, बेघर वृद्ध आजी-आजोबांचा सांभाळ केला जातो. या समाजोपयोगी प्रकल्पाला भेट देण्यासाठी सुप्रसिद्ध व जेष्ठ सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी प्रार्थना फाऊंडेशनला भेट दिली.5000यावेळी त्यांनी आश्रमातील मुलांशी तसेच वृद्ध आजी-आजोबांशी संवाद साधला. “मुलांनी अभ्यास करावा, कष्ट करावे आणि सक्षमपणे स्वतःच्या पायावर उभे राहावे,” असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. त्यांच्या या प्रेरणादायी भेटीमुळे आश्रमातील मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.5000दरम्यान, प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून आणि अविरत फाऊंडेशन, पुणे यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या विषमुक्त सेंद्रिय शेती प्रकल्पाचे उद्घाटन मकरंद अनासपुरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांनी स्वतः पहिले ग्राहक बनून विषमुक्त भाजीपाला विकत घेतला.5000यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन करत सांगितले की, “आरोग्यदायी जीवनासाठी विषमुक्त अन्न महत्त्वाचे आहे. प्रार्थना फाऊंडेशनच्या या उपक्रमातून तयार होणारा भाजीपाला नागरिकांनी खरेदी करावा आणि विषमुक्त अन्नाच्या दिशेने योग्य पाऊल टाकावे.”

या कार्यक्रमाला मोरवंचीचे सरपंच सूर्यभान धोत्रे, शिरापूरचे उपसरपंच सौदागर साठे, अमोल सावंत, प्रार्थना फाऊंडेशनच्या सचिव अनु मोहिते, समाधान वडने, विष्णू भोसले, शुभम मिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रार्थना फाऊंडेशनच्या या उपक्रमामुळे समाजसेवा आणि आरोग्यदायी शेती यांचा संगम साधला जात असून भविष्यात हा प्रकल्प अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button