तीन वर्षांच्या आधिराचे तुटलेले बोट वाचवण्यात प्लास्टिक सर्जन डॉ. चेतन धांडोरे यांना यश!

धांडोरे हॉस्पिटलमध्ये अत्यंत नाजूक प्लास्टिक सर्जरी यशस्वी; २४ दिवसांच्या उपचारानंतर चिमुकलीचे बोट सुखरूप
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर, बार्शी : वैद्यकीय क्षेत्रात कौशल्य, अनुभव, संवेदनशीलता आणि रुग्णसेवेची तळमळ यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला तो सोलापूर येथील धांडोरे हॉस्पिटल फ्रॅक्चर, ॲक्सिडेंट अँड प्लास्टिक सर्जरी सेंटरमध्ये. बार्शी तालुक्यातील गुळपोळी येथील अवघ्या तीन वर्षांच्या आधिरा भैरवनाथ चौधरी या चिमुकलीच्या गंभीर जखमी झालेल्या उजव्या हाताच्या बोटावर यशस्वी प्लास्टिक सर्जरी करून डॉक्टरांनी तिचे बोट वाचवण्यात यश मिळवले आहे.
आधिराच्या उजव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली होती. बोट जवळपास तुटलेल्या अवस्थेत होते आणि केवळ दहा टक्के भाग शिल्लक राहिला होता. बोटातील हाडे व शिरा तुटल्या होत्या, तसेच नखही निघाले होते. अशा अत्यंत नाजूक आणि आव्हानात्मक परिस्थितीत बोट पुन्हा व्यवस्थित जोडणे हे डॉक्टरांसमोर मोठे आव्हान होते.
या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन धांडोरे हॉस्पिटलमधील प्लास्टिक, कॉस्मेटिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन डॉ. चेतन ध्रुव धांडोरे यांनी विशेष कौशल्याने शस्त्रक्रिया केली. जखमेची व्यवस्थित स्वच्छता करून आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पार पाडली. बोटातील नाजूक भागांची काळजी घेत योग्य पद्धतीने दुरुस्ती करून टाके घालण्यात आले. विशेष म्हणजे रविवारची सुट्टी असूनही डॉ. धांडोरे यांनी लवकर हॉस्पिटलमध्ये येऊन आधिरावर शस्त्रक्रिया केली. त्यांच्या तत्परतेमुळे आणि कुशल उपचारांमुळे चिमुकलीचे बोट वाचवण्यात यश आले.
शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली नियमित काळजी घेण्यात आली. तब्बल २४ दिवसांनंतर बोटावरील टाके व इतर उपचारांसाठी लावलेले साहित्य काढण्यात आले. या उपचारांनंतर आधिराचे बोट जिवंत राहिल्याने चौधरी कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.
रुग्णसेवेला प्राधान्य देणारे संवेदनशील डॉक्टर
डॉ. चेतन ध्रुव धांडोरे यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ शस्त्रक्रिया करून थांबत नाहीत, तर रुग्णांची स्वतः काळजी घेतात. रुग्णांना उपचारांची माहिती समजावून सांगणे, जखमींच्या मलमपट्टीकडे लक्ष देणे, रुग्ण व नातेवाईकांना धीर देणे आणि प्रत्येक रुग्णाला आपुलकीची वागणूक देणे, यामुळे त्यांनी रुग्णांचा विश्वास संपादन केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून धांडोरे हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या प्लास्टिक सर्जरी यशस्वी केल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरील रुग्णही उपचारांसाठी त्यांच्याकडे येत आहेत. प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी क्षेत्रातील त्यांचे काम दिवसेंदिवस व्यापक होत आहे. वैद्यकीय सेवेसोबतच ते प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहेत.
आधिराच्या कुटुंबीयांनी डॉ. चेतन ध्रुव धांडोरे यांच्या तत्परतेबद्दल, कौशल्यपूर्ण उपचारांबद्दल आणि मोलाच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
डॉक्टरांचे कौशल्य, योग्य वेळी मिळालेले उपचार आणि रुग्णसेवेची भावना यामुळे एका चिमुकलीचे बोट वाचले. ही घटना केवळ वैद्यकीय यशाची नाही, तर रुग्णसेवेतील माणुसकीचीही प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.
हॉस्पिटलचा पत्ता व संपर्क
धांडोरे हॉस्पिटल फ्रॅक्चर, ॲक्सिडेंट अँड प्लास्टिक सर्जरी सेंटर
डॉ. चेतन ध्रुव धांडोरे M.B.B.S., M.S. (General Surgery), M.Ch. (Plastic Surgery), Mumbai
प्लास्टिक, कॉस्मेटिक अँड रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जन
पत्ता :
धांडोरे हॉस्पिटल
मंजिरी पार्क, नेहरू नगरजवळ, विजापूर रोड, सोलापूर – ४१३००४.
फोन : ०२१७-२३४२२८४



