हर घर तिरंगा व सायकल बॅंक उपक्रमाची जनजागृती करा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

आरंभ प्रशिक्षणाचा पंढरीत शुभारंभ

सोलापूर : अनौपचारिक शिक्षणातून बालकांची गुणवत्ता वाढवा. हर घर तिरंगा व सायकल बॅंक उपक्रमाची जनजागृती करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.पंढरपूर पंचायत समितीच्या शेतकरी सभागृहात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील 3 ते 6 वर्षे वयोगटातील बालकांच्या पूर्व शालेय शिक्षणाच्या अनुषंगाने आरंभ प्रशिक्षणाचा शुभारंभ आज स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी जावेद शेख, राज्य प्रशिक्षक कांबळे, बालविकास प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारुळे, अनुराधा शिंदे, व जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होत्या.यावेळी बोलताना स्वामी म्हणाले, अंगणवाडीचा उद्देश केवळ बालकांचा पूरक आहारातून शारिरीक विकास करणे इतकाच नसून अनौपचारिक शिक्षणातून बौध्दिक विकास करणे हा देखील आहे. बालक घरामध्ये असताना देखील त्याचा छोट्या छोट्या गोष्टीतून विकास कसा करावा याबाबत पालकांना देखील प्रशिक्षीत करणे गरजेचे आहे. यावेळी स्वामी यांनी केंद्र शासनाचा हर घर तिरंगा उपक्रम व मुलींची शाळा गळती रोखणेसाठी जिल्हा परिषदेमार्फत सुरु करण्यात आलेला सायकल बँक या उपक्रमाबाबत जनजागृती करून दोन्ही उपक्रम यशस्वीपणे राबविणेबाबत उपस्थितांना आवाहन केले.बालकांच्या विकासामध्ये पूर्व शालेय शिक्षणाचा सिंहाचा वाटा असून प्रशिक्षणार्थी, अंगणवाडी पर्यवेक्षिकांनी प्रशिक्षण सत्र मन लावून पूर्ण करावे. जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी सेविकांना पूर्व शालेय शिक्षणाबाबत स्वयंभू करून अंगणवाडीच्या पूर्व शालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणेचे आवाहन केले. यावेळी महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या घरोघरी तिरंगा, घरोघरी पोषण या उपक्रमामध्ये सक्रीय सहभाग घ्या, असे आवाहनही स्वामी यांनी केले.शेख म्हणाले, पूर्व शालेय शिक्षण हा बालकांच्या विकासाचा पाया असल्याने आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिकांचे पूर्व शालेय शिक्षणाबाबतचे आरंभ प्रशिक्षण सत्र 3 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2022 या कालावधीत दोन बॅच घेण्यात येणार आहेत. प्रशिक्षण सत्रासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी जगन्नाथ गारुळे, रेश्मा पठाण, अनुराधा शिंदे, अनुराधा परूरकर, शोभा तडलगी, सुगराबी नदाफ व श्रीमती वालकोळी यांनी प्रयत्न केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या