आरटीई प्रवेशासाठी असलेली 1 कि.मी. ची अट रद्द , अर्ज भरण्यास 25 मार्च पर्यंत मुदतवाढ

0

B1न्यूज मराठी नेटवर्क50000

चंद्रपूर, दि. 20 : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार आर्थिकदृष्या दुर्बल आणि वंचित घटकांतील मुलांसाठी खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के मोफत शिक्षणांची तरतूद आहे. आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी 1 कि.मी. पर्यंतच्या अंतरावरील शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य पालकांना देण्यात आलेले होते. तथापि उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर येथे दाखल याचिकेवर न्यायालयाने नोंदविलेल्या निरिक्षणानुसार आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश जर 1 कि. मी. अंतरावर शाळा उपलब्ध नसेल, तर मुलांना त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळेमध्ये प्रवेश घेण्यापासून रोखता येणार नाही. त्यानुसार 25 टक्के प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी असलेली 1 कि.मी. अट रद्द करण्यात आली आहे.5000ज्या पालकांनी 1 कि.मी. च्या आत असलेल्या शाळांची निवड करून अर्ज भरलेला आहे, तसेच ज्या पालकांनी आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यांना आता 1 कि. मी., 1 ते 3 कि.मी. तसेच 3 कि.मी. पेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झालेल्या आहेत. तरी संबंधितांना आरटीई पोर्टलवर आपला आरटीई 25 टक्केचा अर्ज unconfirm करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित पालकांना याबाबत आरटीई 25 टक्के पोर्टलवरून आवश्यक ती माहिती भरून सुधारित अर्ज करता येईल. तसेच आरटीई 25 टक्के प्रवेशासाठीचे अर्ज भरण्यास 25 मार्च 2026 पर्यंत मुद्दतवाढ देण्यात आल्याचे पुणे येथील शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी कळविले आहे.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या