नगर परिषद, नगर पंचायतींनी ऊर्जा व्यवस्थापनासाठी सौर ऊर्जेवर अधिक भर देणे आवश्यक – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

नागपूर : सौर ऊर्जेसाठी उपलब्ध असलेले संधी लक्षात घेऊन जिल्ह्यातील नगरपालिका नगर पंचायतींनी अधिक सकारात्मक भुमिका घेऊन आपली कार्यालये, पथदिवे यासाठी सौर ऊर्जेचा वापर होण्याच्यादृष्टीने प्राधान्य दिले पाहिजे. याचबरोबर आपआपल्या हद्दीतील क्रीडांगणे अधिक चांगल्या सोयी-सुविधांसह परीपूर्ण केली पाहिजेत, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.

सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे नगर पालिका प्रशासनासह विविध विभागांची आढावा बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी माजी आमदार टेकचंद सावकर, विविध नगर परिषद व नगरपंचायतींचे नगराध्यक्ष, जिल्हा नगरपालिका प्रशासन अधिकारी विनोद जाधव संबंधित नगरपालिका व नगरपंचायतीचे मुख्याधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायती क्षेत्रातील पाणीपुरवठा, स्वच्छता, ऊर्जा, घनकचरा व्यवस्थापन, पट्टेवाटप, प्रधानमंत्री आवास योजना, शाळा, आरोग्य व्यवस्था आदींचा त्यांनी आढावा घेतला.

क्रीडांगणे ही आज काळाची गरज आहे. यातूनच भविष्यातील उज्वल खेळाडू घडणार आहेत. यातील काही राष्ट्रीय पातळीवरही खेळू शकतील असा विश्वास नगर परिषद, पालिकांनी दृष्टीपथात ठेवून याला चालना दिली पाहिजे. नागरीकीकरणाच्या प्रक्रीयेत केवळ सांडपाणी दिवाबत्तीच्या सुविधेपुरते मर्यादीत न राहता आपल्या गावाचा कला, साहित्य, सांस्कृतिक विकासाच्यादृष्टीनेही विचार करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. प्रत्येक नगरपंचायत व नगरपरिषद क्षेत्रात किमान तीन ते पाच क्रीडांगणे विकसित करण्यात यावीत. आवश्यकता असेल तर नविन विकास आराखड्यात याचा समावेश केला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.50000हेल्थ सेंटर, स्वच्छतेसाठी सर्वंकष आराखडा आवश्यक असतो. ज्या ठिकाणी प्रलंबित नळयोजना आहेत त्या पूर्णत्वास नेल्या पाहिजेत. प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या महत्वपूर्ण कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हा वार्षिक योजनेतून नगरपालिकांमध्ये शाळांची गुणवत्ता वाढ, शाळेचे आधुनिकीकरण, शहरी भागातील अंगणवाड्या सक्षम करणे, नागरी आरोग्य केंद्राची निर्मिती, पावसाळ्यापूर्वी सर्व मोठ्या नाल्यांचे खोलीकरण-साफसफाई करणे ही कामे तातडीने हाती घेण्यात आली पाहिजेत. प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतीमध्ये विकेंद्रीत पाणी पुरवठा योजना, मोहल्ला निहाय छोट्या पाणीपुरवठा योजना तयार करणे, आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत पूरप्रवण क्षेत्रनिहाय प्रस्ताव सादर करणे, प्रधानमंत्री आवास योजना 2.0 च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पट्टेवाटप करणे व सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देणे या कामाला अधिक प्राधान्य देण्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. प्रत्येक नगरपालिकेने भुयारी गटार योजना, मलनिस्सारण योजनांची कामे प्राधान्याने हाती घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्य परिवहन महामंडळाचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस थांब्यावर थांबत नसल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना विनाकारण ताटकळत राहावे लागते. याबाबत पालकमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. सोबत अनेक बसेस मौद्याला थांबत नाहीत. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसेसचे व्यवस्थित नियोजन करुन शाळकरी मुली व मुलींना त्रास होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याचे त्यांनी सांगितले.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या