“शिवजन्मासाठी जिजाऊंचे संस्कार आवश्यक” बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेजमध्ये शिवजयंतीतून युवकांना प्रेरणेचा जागर

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी येथे अंतर्गत मूल्यमापन समिती (IQAC), राष्ट्रीय सेवा योजना व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साह, प्रेरणा आणि राष्ट्रभक्तीच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. जे. पी. डमरे मॅडम उपस्थित होत्या, तर अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे सर होते. कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. ए. ढगे, प्रा. के. एम. माळी, वाणिज्य विभाग प्रमुख के. बी. चपटे, ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. जे. आर. यादव मॅडम, ज्युनिअर विभाग प्रमुख पोहोळकर सर तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. बी.कॉम भाग ३ चे विद्यार्थी यश मनोज रणसुभे यांनी आपल्या मनोगतातून शिवजयंती ही केवळ औपचारिकता नसून आदर्श, स्वाभिमान आणि कर्तव्यनिष्ठा अंगीकारण्याचा दिवस असल्याचे सांगितले. विद्यार्थिनी क्षितिजा गायकवाड यांनी शिवचरित्र समजून घेण्यासाठी ऐतिहासिक ग्रंथ वाचनाचे महत्त्व अधोरेखित करत युवकांनी नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम आत्मसात करावे, असा संदेश दिला.

प्रमुख पाहुण्या प्रा. जे पी. डमरे मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनात शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासातील संघर्ष, पराक्रम आणि दूरदृष्टी यांचा प्रभावी आढावा घेतला. “शिवरायांचे धैर्य, नियोजनकौशल्य आणि प्रजाहितदक्षता ही आजच्या तरुणाईसाठी दिशादर्शक दीपस्तंभ आहेत,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना सकारात्मक विचार, शिस्त आणि संघटनशक्ती जोपासण्याचे आवाहन केले.50000अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. एस. बी. करंडे सर यांनी अत्यंत प्रभावी शब्दांत सांगितले, “छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी आधी जिजाऊसारख्या मातांचा जन्म होणे आवश्यक आहे.” आजच्या पिढीने जिजाऊंसारखे संस्कार आपल्या मुलांवर केले तरच समाजात आदर्श नेतृत्व निर्माण होईल, असे प्रतिपादन त्यांनी केले. शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या संस्कारमूल्यांचा वारसा जपणे हीच खरी शिवजयंती साजरी करण्याची भावना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवानी पवार यांनी प्रभावीपणे केले. प्रास्ताविक प्राची मस्तुद यांनी केले तर आभार प्रदर्शन सलीम तांबोळी यांनी मानले. या कार्यक्रमामुळे महाविद्यालयीन परिसरात देशभक्ती, स्वाभिमान आणि कर्तव्यभावनेची नवचेतना निर्माण झाली. युवकांनी शिवरायांच्या विचारांचा वारसा जपत समाजनिर्मितीसाठी सज्ज राहण्याचा निर्धार व्यक्त केला.50000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या