शिवजन्मोत्सवा निमित्त फिनिक्स पोदार लर्न स्कूलची भव्य सामाजिक जागृती रॅली

0

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

बार्शी : शिवजयंतीच्या निमित्ताने फिनिक्स पोदार लर्न स्कूल,बार्शी येथे उत्साहपूर्ण वातावरणात विविध समाज जागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी “निसर्ग संवर्धन, महिला सक्षमीकरण, स्वराज्य व सामाजिक एकता तसेच जल व्यवस्थापन” हा प्रेरणादायी सामाजिक संदेश देत बार्शी शहरात भव्य रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्शांवर आधारित शिवपोवाडा, प्रभावी पथनाट्य, भाषणे तसेच लेझीम, लाठी-काठी आणि कराटेची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणाने कार्यक्रमाला देशभक्तीचा रंग चढला.50000रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी हातात विविध संदेशफलक घेऊन पर्यावरण संरक्षण, स्त्री सन्मान, जलसंधारण आणि सामाजिक ऐक्याबाबत नागरिकांमध्ये जागृती केली. या उपक्रमाला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शाळेचे प्रेरणास्थान विजय कबाडे, संस्थेचे अध्यक्ष वैशाली कबाडे, सचिव संदीप बरडे तसेच प्राचार्य रविराज बेलूरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले. समारोप प्रसंगी न्याय, समानता व स्वाभिमान या मूल्यांनुसार समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्याचा संकल्प करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करणारा हा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी ठरला.50000500000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या