पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ’देशभक्तीपर चित्रपट महोत्सव’ संपन्न

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्रे संकुलाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशभक्तीपर चित्रपट प्रदर्शन व मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठात प्रथमच कुलगुरु प्रकाश महानवर आणि सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे, जनसंज्ञापन विभागचे प्र. प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली देशभक्तीपर चित्रपटाचे प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आणि जन संज्ञापन विभागाचे प्र. विभाग प्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर म्हणाले की, कोणताही देशभक्तीपर चित्रपट हा केवळ भावनांवर आधारित नसून, त्यामागे एक भक्कम संशोधन आणि संहितेची गरज असते.चित्रपटात मनोरंजना बरोबरच सामाजिक प्रश्न मांडलेल जातात आणि त्याचा सकारात्मक परिणाम समाज परिवर्तनासाठी होतो. असे स्पष्ट केले. डॉ. आंबादास भास्के यांनी चित्रपट समीक्षेवर भाष्य करताना सांगितले की, विद्यार्थ्यांनी चित्रपट पाहताना तो एक समीक्षक म्हणून पाहावा. चित्रपटाचा उद्देश आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात दिग्दर्शक किती यशस्वी झाला, याचे विश्लेषण करण्याची कला अवगत करणे आवश्यक आहे.

चित्रपटाच्या तांत्रिक बाजूवर प्रकाश टाकताना प्रा. ऋषीकेश मंडलिक यांनी कॅमेरा हालचाली आणि ’शॉट्स’चे प्रकार यावर मार्गदर्शन केले. एखादा प्रसंग अधिक प्रभावी करण्यासाठी कॅमेरा अँगल कसा काम करतो, हे त्यांनी उदाहरणांसह पटवून दिले. प्रा. विक्रम बरडे यांनी संपादन या विषयावर बोलताना सांगितले की, संपादन हा चित्रपटाचा कणा असतो; योग्य वेळी योग्य शॉट कापला गेल्यानेच चित्रपटाची गती कायम राहते.

भैरव भुसारे यांनी चित्रपटातील लाईटिंग आणि प्रकाशयोजनेचे महत्त्व सांगितले. रंगांचा वापर आणि प्रकाश यामुळे दृश्यातील भावना कशा बदलतात, याचे त्यांनी विश्लेषण केले. तसेच प्रा. विठ्ठल एडके यांनी चित्रपटातून दिला जाणारा सामाजिक संदेश आणि त्याचे समाजावर होणारे परिणाम, चित्रपट निर्मितीचा दृष्टीकोन या विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या विशेष प्रदर्शनासाठी सामाजिक शास्त्रे संकुलातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या चित्रपट प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत होण्यासोबतच, चित्रपट या माध्यमाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन निर्माण झाला. देशभक्तीपर चित्रपट प्रदर्शनसाठी डॉ. तेजस्वीनी कांबळे आणि डॉ. तारिक तांबोळी यांनी पुढाकार घेवून विशेष परिश्रम घेते. सुत्रसंचालन विद्यार्थी कुणाल बाबरे यांनी केले.5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या