फिनिक्स पोदार लर्न स्कूल, बार्शी येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : येथील फिनिक्स पोदार लर्न स्कूलमध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली कबाडे उपस्थित होत्या. प्रमुख उपस्थितीत संस्थेचे सचिव संदीप बर्डे व मुख्याध्यापक रविराज बेलुरे होते. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी अध्यक्षा वैशाली कबाडे यांनी आपल्या थोडक्यात भाषणात भारतीय संविधानाने दिलेले स्वातंत्र्य, समता व बंधुता ही मूल्ये विद्यार्थ्यांनी आत्मसात करावीत असे सांगितले. तसेच देशघडणीत शिक्षणाची भूमिका अधोरेखित केली. संस्थेचे सचिव संदीप बरडे यांनी शिस्त, जबाबदारी व राष्ट्रप्रेम हीच खरी प्रजासत्ताक दिनाची भावना असल्याचे नमूद केले.
मुख्याध्यापक रविराज बेलुरे यांनी विद्यार्थ्यांना चांगले नागरिक बनून संविधानाचा सन्मान राखण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे, गीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने करण्यात आली.




