इचलकरंजी येथे अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रेरणा किरण पुरस्काराचे वितरण
बार्शी तालुक्यातील प्रल्हाद तुरे, निलेश उबाळे, जयश्री चव्हाण- पवार, शंकर लाखे, अमीन गोरे, रिजवाना पठाण आणि रजनी पाटील यांचा सन्मान
B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : इचलकरंजी च्या A J सोशल वेलफेअर फौंडेशन यांच्या वतीने महाराष्ट्र भरातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रतीक्षा लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर राष्ट्रीय समजकल्याण परिषद चे सागर दोलतडे, पैंगबर शेख संस्थेच्या अध्यक्ष डॉ. अबोली जिगजीनी आदी उपस्थित होते.
या पुरस्कार वितरण कार्यक्रमात बार्शी तालुक्यातील यावली येथील मा. सरपंच प्रल्हाद तुरे यांना महात्मा फुले कार्यगौरव पुरस्कार देऊन तर पत्रकार निलेश उबाळे यांना नॅशनल युथ प्राईड आयकॉन,कांदलगाव येथील ग्रामविकास अधिकारी जयश्री चव्हाण यांना सावित्रीबाई फुले कार्यगौरव पुरस्कार तर शंकर लाखे पत्रकार अमीन गोरे यांना महाराष्ट्र युवा गौरव पुरस्कार, रिजवाना पठाण यांना ग्रेट मेहंदी आर्टिस्ट आणि पांगरीच्या युवा नेत्या रजनी पाटील याना युथ प्राईड पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा सन्मान दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी इचलकरंजी येथील फॉरच्यून सिनेप्लेक्स या हॉल मध्ये वरील मान्यवरांच्या हस्ते पार पडला. पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे बार्शी तालुक्यात कौतुक होत असून त्यांचा विविध ठिकाणी सत्कार केला जात आहे.




