श्री शिवाजी महाविद्यालयात गटचर्चेतून स्त्री शक्तीच्या विचारांचे प्रकटीकरण

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : भारत, इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिका आदी देशांमध्ये स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळी उभारल्या. स्त्रीमुक्तीसाठी निर्देशने व आंदोलने झाली. त्यातूनच स्त्रीच्या विकासाची दिशा स्पष्ट झाली. ग्रेटा थनबर्ग, मलाला युसुफझाई, सुनिता विल्यम्स, दिव्या देशमुख, जान्हवी पोवार आदींची नावे कानावर पडतात. विविध क्षेत्रांमध्ये सध्या स्त्रियांचा सहभाग असतो.

हाच उद्देश ठेवून श्री शिवाजी महाविद्यालयात बीएस्सी भाग- २ या वर्गासाठी २१ व्या शतकामध्ये स्त्रीचे स्थान,अस्तित्व व वाटचाल या विषयावर गटचर्चा करण्यात आली. राष्ट्रीय बालिका दिन व बेटी बचाव व बेटी पढाव योजनेचे औचित्य साधून या गटचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. कवी जयंत महापात्रा यांच्या हंगर व कवी आघा शाहिद अली यांच्या द राईट इमेज कवितांची चर्चा गटचर्चेस कारणीभूत ठरली.

वर्गशिक्षक प्रा. डॉ. राहुल पालके यांनी विद्यार्थ्यांची पाच गटांत विभागणी केली.सावित्री, झाँशी, सुनिता, दिव्या व मिथाली अशी त्यांना अनुक्रमे नावे देण्यात आली. सावित्री गटातून प्रातिनिधिक स्वरूपात प्रिया पाटील म्हणाली, स्त्रीने शिक्षण घेवून आदर्श समाजाची रचना करावी. तिला येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्यासाठी घरच्यांचे व समाजाचे पाठबळ हवे. तिला आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी द्यावी. झाँशी गटातून प्रगती गायकवाड म्हणाली, घरामधून समानतेची व समतेची धारणा याची वाढीस लागायला हवी. कौटुंबिक हिंसा, अत्याचार अशा घटनांना प्रतिबंध घालणे गरजेचे आहे.

सुनिता गटातून धनश्री कागदे हिने मुलींच्या शिक्षणासाठी घरच्यांचा व समाजाचा पाठिंबा हवा,असे मत मांडले. ज्ञानेश्वरी नवले हिने आजची स्त्री गतिमान होत असून ती अडचणींना तोंड देण्यासाठी सक्षम हवी. त्याचबरोबर स्त्री शिक्षणाबाबत समाजाची मानसिकता अजून बदलायला हवी, असा विचार मांडला. साक्षी मुकरे हिने हरवलेल्या मुलींच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त करीत कायद्याचे पाठबळ वाढावे. समाजाचा पाठिंबा स्त्री विकासाला हवा,असे मत व्यक्त मांडले.

याप्रसंगी डॉ. पालके यांनी २१ व्या शतकात स्त्रीला येणाऱ्या अडचणींचा ऊहापोह केला. समाज ,साहित्य,अर्थकारण राजकारण, क्रीडा आदी क्षेत्रांतील स्त्रियांच्या योगदानाबद्दल चर्चा केली.त्याचबरोबर शहरी व ग्रामीण भागातील स्त्रियांचे विश्व व त्यांना भेडसावणाऱ्या समस्या यांची पोलखोल केली. मुलींच्या शिक्षणाबाबत सकारात्मकता मांडून शिक्षणाचे महत्त्व प्रस्तुत केले. त्याचबरोबर पारंपारिक शिक्षण घेत असताना ज्ञानाबरोबरच कौशल्याधिष्ठित राहण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.

२१ व्या शतकात स्त्रीचे स्थान,अस्तित्व व वाटचाल यावर प्रकाश टाकून त्यांनी गतिमान व सशक्त समाजाची धारणा कशी अंमलात येईल यावर भाष्य केले. प्राचार्य डॉ. ए. बी. शेख व इंग्रजी विभागप्रमुख डॉ. एस. डी. पवार यांनी या उपक्रमास शुभेच्छा दिल्या. या गटचर्चेस ५ गटांमधून ८० विद्यार्थी सहभागी झाल्याने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने लोकशाही मूल्यांची रूजवणूक झाली.

डॉ. राहुल पालके यांची जेन Z उद्देशून कविता

आईने संस्कार दिले , बापाने शिस्त दिली

मातीने बळ दिले, गुरुंनी ज्ञान दिले

मित्रांनी साथ दिली, दिवस-रात्र ध्येयाला

हाक दिली, अपयशाला मात दिली

अंधःकाराची रात्र संपली, यशाची सोनेरी पहाट उगवली5000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या